मुंबई: हॉकी इंडियाने(hockey india) पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी बुधवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंहला कर्णधार आणि हार्दिक सिंहला उप कर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय संघात ५ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करतील याशिवाय संघात गेल्या टप्प्यात भाग घेणारे काही वरिष्ठ खेळाडूही सामील आहेत.
टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाला माजी विजेता बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंडसोबत ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आले आहे. ग्रुपमध्ये पहिले चार टॉप संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचतील.
भारतीय खेळाडू यावेळेस बंगळुरूच्या साई केंद्रांत राष्ट्रीय शिबिरात ऑलिम्पिकची तयारी करत आहेत. अनुभवी गोलकीपर श्रीजेश आणि मिडफिल्डर मनप्रीत सिंह चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतील. तर कर्णधार हरमरप्रीत सिंगची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा असेल.
तर ५ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करत आहेत. यात जरमनप्रीत सिंग, संजय, राज कुमार पाल, अभिषेक आणि सुखजीत सिंग यांचा समावेश आहे.
भारतीय संघ
गोलकीपर – पीआर श्रीजेश
डिफेंडर – जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय
मिडफिल्डर – राजकुमार पाल, शमशेर सिंह, मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद
फॉरवर्ड – अभिषेक, सुखजीत सिंह, ललित कुमार उपाध्याय, मंदीप सिंह, गुरजंत सिंह
पर्यायी खेळाडू – नीलकांत शर्मा, जुगराज सिंह, कृष्ण बहादूर पाठक.