Saturday, June 29, 2024
Homeमहाराष्ट्रNilesh Rane : तुमच्यातील खरा माणूस अनेकांना समजलाच नाही!

Nilesh Rane : तुमच्यातील खरा माणूस अनेकांना समजलाच नाही!

नारायण राणेंच्या शपथविधीनंतर निलेश राणेंची भावनिक पोस्ट

मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) यांनी संसदेत खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचे पुत्र कोकणातील भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक भावनिक पोस्ट ‘एक्स’वर शेअर केली आहे. तुम्हाला सगळी पदे सहज मिळाली नाहीत, तुम्ही केलेला संघर्ष पाहिला, तुमच्यातला खरा माणूस अनेकांना कळलाच नाही, अशा भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या. तसेच खासदारकीची पाच वर्षे जीव तोडून कोकणासाठी काम करणार असल्याचेही निलेश राणे यांनी सांगितले. भाजपाचे नवनियुक्त खासदार नारायण राणे यांनी संसदेत खासदारपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणेंनी एक पोस्ट लिहून नारायण राणेंचा नगरसेवक, आमदार ते खासदारकीपर्यंतचा प्रवास मांडला.ढ़

काय आहे निलेश राणेंचे ट्वीट?

१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधान परिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार. ही सगळी पदे सहज आली नाहीत, त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला, ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथंपर्यंत आलो, मलाच कळले नाही. पण तुम्हाला जरी नाही कळले तरी ते आम्हाला दिसले. इतकी लोकं इतके वर्षे जोडून ठेवणे सोपे नाही.

जीवनात सरळ काहीच मिळत नाही, हे आम्हाला समजले. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही की निलेश, नितेशला सांभाळा. कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला, त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खासकरून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्षं जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळे शक्य आहे.

कोकणच्या निरंतर विकासासाठी आणि विकसित भारताच्या उभारणीच्या ध्येयासाठी समर्पित 

रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संसदेत खासदार पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर नारायण राणे यांनी व्यक्त होत कोकणच्या निरंतर विकासासाठी आणि विकसित भारताच्या उभारणीच्या ध्येयासाठी स्वत:ला समर्पित करत असल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, आज १८व्या लोकसभेत लोकसभेचा खासदार म्हणून शपथ घेताना मला मोठा आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, मी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निरंतर विकासासाठी आणि विकसित भारताच्या उभारणीच्या ध्येयासाठी स्वत:ला समर्पित करण्याची शपथ घेतो.

जय हिंद!
जय महाराष्ट्र !!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -