मुंबई: देशांतील कोट्यावधी घरांमध्ये आज एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर केला जात आहे. यामुळे महिलांचे आयुष्य अतिशय सोपे झाले आहे. एकीकडे गॅस सिलेंडर एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. मात्र दुसरीकडे निष्काळजीपणा केल्यास अनेकदा गॅस सिलेंडर जीवघेणा ठरू शकतो. अनेकदा घरांमध्ये गॅस सिलेंडर लीकेज होतो. अशातच याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
पेट्रोलियम तसेच प्राकृतिक गॅस मंत्रालयाने दिले आश्वासन
पेट्रोलियम तसेच प्राकृतिक गॅस मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर याबाबत माहिती देताना लोकांना सांगितले की गॅस लीकेजच्या स्थितीत काय केले पाहिजे. यासोबतच लोकांना मदतीसाठी एक एमर्जन्सी नंबर दिला आहे.
गॅस लीकेज असल्यास इमर्जन्सी सर्व्हिस नंबर १९०६वर करा कॉल
पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार जर तुमच्या घरात गॅस लीकेज होत असेल तर अशा स्थितीत घाबरू नका. स्वत:ला शांत ठेवा. यानंतर सगळ्यात आधी आपल्या गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करा. गॅस सिलेंडर बंद केल्यास गॅस गळती रोखली जाऊ शकते.
यानंतर गॅस गळती इमर्जन्सी सर्व्हिस नंबर १९०६वर कॉलर करा. मंत्रालयाच्या माहितीनुसार इमर्जन्सी नंबर १९०६ वर कॉल केल्यास दोन ते चार तासांच्या आत तुमचा त्रास दूर होऊ शकतो.