Sunday, August 31, 2025

'भाभीजी घर पर है' फेम गोरी मेमने खरेदी केली ही जबरदस्त कार

'भाभीजी घर पर है' फेम गोरी मेमने खरेदी केली ही जबरदस्त कार
मुंबई: टीव्हीवरील प्रसिद्ध शो भाभीजी घर पर हैमधील गोरी मेम म्हणजेच अभिनेत्री सौम्या टंडनने आपल्या कलेक्शनमध्ये एक जबरदस्त कार सामील केली आहे सौम्या टंडनने आपल्या कार कलेक्शनला अपग्रेड करताना नवी मर्सिडिज बेंझ ई क्लॉस सिडान कार खरेदी केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असलेल्या या कारची सुरूवातीची किंमत ७५ लाख रूपये आहे. सौम्या टंडनने या कारसोबत उभी राहत काही फोटो क्लिक केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलर व्हाईट कलरची ही कार आपल्या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते.  
कारबद्दल बोलायचे झाल्यास मर्सिडिज बेंझ ई क्लास यावेळेस लाँग व्हीलबेस व्हर्जनमध्ये भारतीय बाजारात विकली जाते. याच्या टॉप मॉडेलची किंमत ८९.१५ लाख रूपये आहे. या सर्व किंमती एक्स शोरूमची आहे. कंपनीचा दावा आहे की हे डिझेल व्हर्जन केवळ ६ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >