नवी दिल्ली: संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान लोकसभा सभापतींची निवडणूक होणार आहे. याबाबत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये दुमत आहे. ही निवडणूक उद्या म्हणजेच बुधवारी होणार आहे. याचमुळे लोकसभेत आपल्या खासदारांना २६ जूनला सदनात उपस्थित राहण्यासीठ तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे.
काँग्रेस संसदीय दलाकडून खासदारांना लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की उद्या लोकसभेत खूप महत्त्वाचा मुद्दा उचलला जाईल. लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना निवेदन केले जाते की कृपया सकाळी ११ वाजल्यापासून सदनात उपस्थित राहावे. हा मेसेज महत्त्वाचा आहे. काँग्रेसकडून हे व्हि के सुरेश यांनी जारी केले आहे. ते विरोधी पक्षाकडून लोकसभेच्या सभापतीपदाचे उमेदवार आहेत.
Congress issues a three-line whip to its party MPs in Lok Sabha to remain present in the House tomorrow, 26th June pic.twitter.com/x9fGMAoOuJ
— ANI (@ANI) June 25, 2024
तर भाजपने आपल्या खासदारांना व्हिप जारी करत बुधवारी लोकसभा सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
लोकसभा सभापतीपदासाठी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये मतभेद
१८व्या लोकसभेत १९५२ नंतर पहिल्यांदा सभापती पदासाठी हे युद्ध पाहायला मिळत आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांचा सामना इंडिया ब्लॉकच्या के सुरेश यांच्याशी आहे. सुरूवातीला अध्यक्षपदासाठी भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आणि विरोधी पक्ष यांच्यात सहमती होत होती मात्र विरोधी पक्षाने मागणी केली की उपसभापती पद त्यांना दिले गेले पाहिजे. मात्र एनडीएने सशर्त समर्थन स्वीकारण्यास नकार दिला.