Friday, June 28, 2024
Homeताज्या घडामोडीGold Price: १९६४मध्ये इतका होता सोन्याचा दर, आता ११३० पटींनी वाढले दर

Gold Price: १९६४मध्ये इतका होता सोन्याचा दर, आता ११३० पटींनी वाढले दर

मुंबई: सोन्याच्या दरात गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. वर्ष १९६४पासून ते आतापर्यंत सोन्याच्या दरात कित्येक पटींनी वाढ झाली आहे.

जुन्या काळापासून सोन्यातील गुंतवणूक ही अतिशय शुभ मानली जाते. आजही सोन्याची क्रेझ काही कमी होत नाही आहे. मात्र वेळेनुसार सोन्याचे दरही गगनाला भिडले आहे.

आज भारतात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने ७१,७४३ रूपयांवर पोहोचला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे की एक वेळ अशी होती की जेव्हा देशात सोने १०० रूपयांपेक्षाही कमी होते.

१९६४ वर्षांपासून ते आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत अनेक पटींनी वाढ झाली आहे. मिळालेल्या डेटानुसार १९६४मध्ये भारतात सोन्याची किंमत ६३.२५ रूपये तोळे इतकी होती.

अशातच तेव्हापासून ते आतापर्यंत जर सोन्याच्या दरांची तुलना केली तर या किंमतीत मोठे अंतर दिसते.

सोन्याच्या दरात १९६४ नंतर आतापर्यंत तब्बल ११३० पटींनी वाढ झाली आहे. साधारणपणे सोन्यामध्ये गुंतवणुकीला संपूर्ण जगभरात पसंती दिली जाते. आता जगभरातील बाजारांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये उलथापालथ होते तेव्हा लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करणे अधिक पसंत करतात.

१९७०मध्ये सोन्याचे दर १८४ रूपये, १९८०मध्ये १३३० रूपये, १९९०मध्ये ३२०० रूपये, २०००मध्ये ४,४००, २०१०मध्ये १८५००, २०२०मध्ये ४८,६७१ रूपये प्रती तोळा होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -