Friday, April 18, 2025
HomeदेशLoksabha speaker : स्वातंत्र्यानंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच होणार निवडणूक!

Loksabha speaker : स्वातंत्र्यानंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच होणार निवडणूक!

सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर

नवी दिल्ली : लोकसभा निकालानंतर (Loksabha result) आता एनडीएचं सरकार (NDA government) स्थापन झालं असून खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. आता लोकसभेतील अध्यक्षनिवडीची प्रक्रिया (Lok Sabha Speaker Election) होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यंदा स्वातंत्र्यांनतर इतिहासामध्ये पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये एकमत न झाल्याने निवडणुकीचा निर्णय घेतला गेला आहे. अन्यथा याआधीचे सर्व उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते.

लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाने उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला (Om Birla) तर विरोधी इंडिया आघाडीकडून (INDIA Alliance) के सुरेश (K. Suresh) यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. सुरुवातीला इंडिया आघाडीने एनडीएच्या उमेदवाराला (NDA Candidate) पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्यासाठी एक अट समोर ठेवली होती. उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावे, अशी ती अट होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ही अट मान्य न केल्याने विरोधी आघाडीने थेट आपला उमेदवार लोकसभा अध्यक्षपदासाठी उभा केला.

काँग्रेसचे केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, ‘विरोधकांचा जर उपाध्यक्ष नसेल तर पाठिंबा देण्याऐवजी आम्ही अध्यक्षपदासाठी आमचाच उमेदवार उभा करू. अशा स्थितीत विरोधी पक्षाकडून के सुरेश यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले. ‘ दरम्यान, ओम बिर्ला आणि के सुरेश या दोघांनीही आज लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. तर उद्या निवडणूक पार पडणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -