Sunday, June 15, 2025

दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांची प्रकृती चिंताजनक

दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली : दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी हरियाणा सरकारच्या विरोधात सुरु केलेले त्यांचे बेमुदत उपोषण थांबवले आहे. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मंगळवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने आतिशी यांनी उपोषण थांबवल्याची माहिती आम आदमी पक्षाने दिली आहे.


हरियाणाने दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडावे या मागणीसाठी आतिशी यांचे बेमुदत उपोषण सुरू होते. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ३६ पर्यंत खाली आली आहे. अतिशी यांच्यावर लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. अतिशी यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण मध्यरात्री ४३ पर्यंत खाली आले होते आणि पहाटे ते ३ वाजता ते ३६ पर्यंत खाली आले, असे सांगत आपने आतिशी यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेत असतानाचे फोटो एक्सवर शेअर केले होते.

Comments
Add Comment