दोन जुलै पासून उपोषणचा इशारा
पेण(देवा पेरवी )- काही वर्षां पूर्वी पासून मोदी सरकार ने एक रुपायात पिक विम्याची घोषणा केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते. या घोषणेनंतर बळीराजाने चोला मंडळ विमा कंपनीकडून आपल्या शेतीचा २०२३ रोजी विमा उतरविला होता. मागील वर्षात अतीवृष्टी मुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्यांनी शेतातील पिकाची कापणी केली असताना अती पावसामुळे पुर्ण पिक वाया जावुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र चोला मंडळ इन्श्युरन्स कंपनीने शेतीचे रीतसर पंचनामे करून देखील नुकसान भरपाई न देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. येत्या १ जुलै पर्यंत संपूर्ण नुकसान भरपाई न मिळाल्यास 2 जुलै रोजी पासून शेतकरी तीव्र आंदोलन करत उपोषण करणार आहेत.
२०२३ च्या विमा धारक शेतकऱ्यांनी शेतीच्या नुकसानाची रितसर तक्रार चोला मंडळ एम.यस. इन्श्युरन्स कंपनी कडे 24 तासाच्या आत केली होती. त्या नुसार सदर शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुद्धा रीतसर झाले होते. परंतु आज पर्यत फक्त २० टक्के शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तेही तुरळक प्रमाणात शेतकऱ्यांची चेष्टा केल्या प्रमाणे. जर का सरकारने १ रुपयात शेतकऱ्यांना विमा दिला असेल पण सरकारने विमा कंपनीला सर्व शेतकऱ्यांच्या विम्याचे देय रक्कम विमा कंपनीला जमा केले आहेत. मग बळीराजाला नुकसान भरपाई देण्यात चोला मंडळ दिरंगाई का करत आहे.
शेतकऱ्यांने शेतीचा विमा उतरवून एक वर्ष झाले पंरतु आज पर्यत नुकसान भरपाई मिळाली नसल्याने पेण खारेपाट विभागातील बळीराजाने पेण येथील तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. तसेच येत्या एक तारखे पर्यन्त नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही झाले तर दोन जुलै रोजी पासून कृषी अधिकारी पेण कार्यालया समोर चोला मंडळ एम.एस. इन्श्युरन्स कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करत उपोषण करणार असल्याचा इशारा संपूर्ण शेतकरी वर्गाने दिला आहे.
raसंबधित चोला मंडळ इन्श्युरन्स कंपनी बरोबर विमा बद्दल पत्र व्यवहार करून तसेच चौकशी करुन व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी बोलुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. – सागर वाडकर, तालुका कृषी अधिकारी-पेण