Saturday, June 29, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane : संजय राऊतांच्या दिल्लीतल्या खासदार बंगल्यावर येतात बॉलिवूडच्या नट्या!

Nitesh Rane : संजय राऊतांच्या दिल्लीतल्या खासदार बंगल्यावर येतात बॉलिवूडच्या नट्या!

‘हमाम में सब नंगे है’, नितेश राणे यांचा राऊतांना सणसणीत टोला

धर्माच्या नावे कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही! जरांगेंच्या मागणीवर नितेश राणे यांची भूमिका

मुंबई : मंडी लोकसभा मतदारंसघातून निवडून आलेल्या खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) काल महाराष्ट्र सदनमध्ये गेल्या आणि त्यांनी तिथे राहण्याच्या रुमबद्दल विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री ज्या ठिकाणी राहतात त्या रुमचीही विचारपूस केली. तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नाही म्हटल्यावर त्या तिथून निघून गेल्या. पण त्यांच्या या गोष्टीवर मिरच्या लागलेल्या संजय राऊतने (Sanjay Raut) काल ट्विट केलं आणि आज सकाळीही पत्रकार परिषदेत वायफळ बडबड केली की त्या असं कसं करु शकतात? पण त्या निवडून आलेल्या खासदार आहेत तुमच्यासारख्या बॅकडोअर एंट्रीवाल्या नाहीत, असा सणसणीत टोला भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांना लगावला.

नितेश राणे आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना उद्देशून म्हणाले, जर हा मुद्दा तुम्ही काढतच असाल तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्र्यांचं शासकीय कार्यालय वर्षा बंगल्यावर सचिन वाझे हा किती दिवस राहायचा? कोणती खोली त्याला दिली होती? एक निवडून आलेल्या खासदार त्यांनी फेरफटका मारला, विचारपूस केली त्यांना ‘नाही’ सांगितलं, त्या निघून गेल्या. पण सचिन वाझे बॅगा भरुन आठवडाभर राहायचे, त्याचं उत्तर तुम्ही कधी देणार? असं नितेश राणे म्हणाले.

संजय राऊत हे महाशय दिल्लीमध्ये ज्या खासदार बंगल्यात राहतात, तिथे कुठली बॉलिवूडची कलाकार किती दिवस येऊन राहिली? याची माहिती आम्ही देऊ का? म्हणून संजय राऊतने समजून घ्यावं की, हमाम में सब नंगे है, उगाच वायफळ बडबड करु नका, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

अडीच वर्षे तुमची सत्ता… तेव्हा काय केलं?

पुण्यामध्ये जे ड्रग्जचं प्रकरण उघडकीस आलं आहे, त्यावर उडता नाशिक, उडता पुना, देवेंद्र फडणवीस याला कसे जबाबदार आहेत, पालकमंत्री कसे जबाबदार आहेत, गेल्या पाच वर्षांमध्ये कोण कोण पोलीस कमिशनर होतं, असे प्रश्न संजय राऊथने उपस्थित केले. पम कदाचित गजनी झालेल्या त्याला माहित नाही की गेल्या पाच वर्षांमध्ये अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. तुमचे मालक मुख्यमंत्री होते. मग त्या कालावधीत ड्रग्ज थांबवण्याच्या दृष्टीकोनातून तुम्ही काय काय केलं? थांबवू शकलात? तुमचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना तर वसुलीच्या चार्जमध्ये जेलमध्ये जावं लागलं, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

आधी उडता मातोश्रीबद्दल विचार कर

उडता पंजाब आणि उडता नाशिक बोलण्याआधी उडता मातोश्रीबद्दल विचार कर. तुमच्या मालकाचा मुलगा हा या ड्रग्ज घेणाऱ्या लोकांसोबत कुठे कुठे असतो? परिणामी सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन यांसारख्या केस कशा घडतात? वांद्रेच्या रिझ्वी कॉलेजच्या मागे कोण कोणाला कशासाठी भेटतात? हे कधीतरी मालकाच्या मुलाला विचारा, त्याची थेरं थांबवा आणि मग बोला, असं नितेश राणे यांनी खडसावलं.

ड्रग्जचं मोठं केंद्र गुजरात की मातोश्री?

पुणे आणि नाशिक ड्रग्जच्या विळख्यात सापडले आणि या ठिकाणी ड्रग्जचं सर्वात मोठं केंद्र असलेल्या गुजरातमधून ड्रग्ज येतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर नितेश राणे पलटवार करत म्हणाले, नक्की गुजरात की कलानगरच्या मातोश्रीचा तिसरा माळा हे ड्रग्जचं सर्वात मोठं केंद्र आहे? याची चौकशी नीट झाली पाहिजे. उडता पंजाबनंतर उडता मातोश्री असा चित्रपट आम्ही काढायचा का? असं नितेश राणे म्हणाले.

धर्माच्या नावे कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला आहे. मनोज जरांगेंनी कुणबी दाखले असलेल्या मुस्लिमांना देखील ओबीसीमधून आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले की, मुस्लिम धर्म असल्याने अशा प्रकारे धर्माच्या नावे कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातच लिहिलं आहे. हिंदू धर्माप्रमाणे मुसलमान धर्मातही विविध जाती आहेत. त्यातील काही श्रीमंत आहेत, त्यांना आरक्षणाची गरज आहे का? यापेक्षा त्यांच्यातील गरीब जाती जसं की पसमांदा जात, शेतकरी आहेत त्यांचा अभ्यास करुन त्यांना आरक्षण द्या, त्याला हरकत नाही. पण ते आम्ही मुस्लिम धर्माच्या नावे मिळू देणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -