मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल गदर २ सिनेमानंतर चर्चेत आहे. गदर २ नंतर अमिषाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. तो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह आहे. चाहत्यांसाठी ती नेहमीच काही ना काही शेअऱ करत असते. अमिषा आस्क मी सेशनच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतेच तिने आपल्या लग्नाच्या प्लानबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली.
एका युजरने अमिषाला विचारले की ती ४९ वर्षांची झाली आहे तिचा लग्न करण्याचा काही प्लान आहे का? यावर अतिशय मजेशीरपणे अमिषाने उत्तर दिले. सोबतच सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली कारण तोही आतापर्यंत सिंगल आहे.
लग्नासाठी तयार आहे अमिषा
अमिषाने उत्तर दिले, सलमानचे लग्न झालेले नाही आणि माझेही नाही. तुम्हाला काय वाटते मी लग्न केले पाहिजे? लग्न की सिने प्रोजेक्ट तुम्हाला काय वाटते काय महत्त्वाचे आहे? अमिषाने पुढे लिहिले, मी आधीपासूनच तयार आहे, मुलगा मिळत नाही आहे.
अमिषा पटेलच्या गदर २ बद्दल बोलायचे झाल्यास या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या सिनेमाने ६०० कोटीहून अधिक कमाई केली. तारा सिंह आणि सकीनाच्या जोडीला खूप प्रेम मिळाले होते.