Friday, June 28, 2024
Homeक्रीडाAFG vs BAN: अफगाणिस्तानने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये, ऑस्ट्रेलिया OUT

AFG vs BAN: अफगाणिस्तानने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये, ऑस्ट्रेलिया OUT

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्याt-20 world cup 2024) सुपर ८ स्टेजमधील शेवटच्या सामन्यात बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात रोमहर्षक सामना रंगला. दोन्ही संघांदरम्यानचा हा सामना किंग्सटाऊनच्या अर्नोस वेल ग्राऊंडमध्ये रंगला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने बांगलादेशला ८ धावांनी हरवत सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले. २७ तारखेला अफगाणिस्तानचा सेमीफायनलमधील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्रिनिदादमध्ये रंगणार आहे.

या सामन्यात विजयासाठी बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमानुसार ११४ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र नवीन उल हकने सलग २ विकेट घेत सामन्यात अफगाणिस्तानचे पारडे उलटवले. सामन्यात कर्णधार रशीद खानने ४ विकेट घेत बांगलादेशचे कंबरडे तोडले.

शेवटच्या २ षटकांतील रोमांचक

बांगलादेशला शेवटच्या २ षटकांत विजयासाठी १२ धावा हव्या होत्या. त्यांचे ८ विकेट पडले होते. बांगलादेशची धावसंख्या ८ बाद १०२ होती. नवीन उल हल १८वे षटक टाकण्यासाठी आले होते. या ओव्हरमध्ये तस्कीन अहमदला नवीनने क्लीन बोल्ड केले.

बांगलादेशच्या आशा संपल्या

बांगलादेशला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी ११६ धावांचे आव्हान १२.१ ओव्हरमध्ये पूर्ण करायचे होते. अशातच आशा संपल्या आहेत. अफगाणिस्तानसाठी हा सामना जिंकणे अतिशय महत्त्वाचे होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -