मुंबई: खराब खाणेपिणे तसेच दिनचर्येमुळे आजकाल लठ्ठपणा वाढत चालला आहे. यामुळे बॉडीचा आकारही बिघडून जातो. वजन कमी करण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करत असतात मात्र जाणते-अजाणतेपणी अशा काही चुका होतात ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढतच जाते.
अधिक खाणे
सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे आपण जे काही हेल्दी खातो त्यामुळे वजन वाढणार नाही. खरंतर शरीरात कॅलरीज वाढल्या की वजन वाढू शकता. मग भले ही हेल्दी जरी खात असले तरी नेहमी संतुलित प्रमाणात खाल्ले पाहिजे.
केवळ खाण्या-पिण्यात सुधारणा
वजन कमी करायचे केवळ खाण्यापिण्यात सुधारणा करून काम चालणार नाही. यासाठी एक्सरसाईजही तितकीच महत्त्वाची असते. व्यायाम केल्याने कॅलरीज बर्न होतात मांसपेशी मजबूत यामुळे मेटाबॉलिज्म वाढतो.
खाणे सोडून देणे
अनेक लोक कॅलरीज कमी करण्यासाठी भूक लागल्यानंतरही खात नाहीत मात्र हे बिल्कुल योग्य नाही. भूक मिटवण्यासाठी काही जण एकाच वेळेस भरपूर खातात मात्र यामुळे वजन वाढू शकते. दिवसभर थोडे थोडे हेल्दी खाल्ले पाहिजे.
पोषकतत्वे असलेले खाणे न खाणे
वजन कमी करण्याच्या नादात अनेक लोक संतुलित खाणे खात नाहीत. याचा फोकस कॅलरीज ठेवण्यावर असतो. मात्र शरीराला चांगले बनवण्यासाठी विविध पोषकतत्वांची गरज असते. यात प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिज्म स्लो होऊ शकतो. यामुळे बॉडीमध्ये फॅट जमा होऊ लागतात.
हेल्दी पदार्थांना अनहेल्दी बनवणे
काही पदार्थ हेल्दी असतात मात्र त्यात असे काही मिसळले जाते ज्यामुळे ते अनहेल्दी बनतात. यामुळे कॅलरीज वाढतात आणि फॅट वेगाने वाढते.