Sunday, June 30, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSunita Williams : धक्कादायक! सुनीला विल्यम्स व बुच विल्मोर अडकले अंतराळात

Sunita Williams : धक्कादायक! सुनीला विल्यम्स व बुच विल्मोर अडकले अंतराळात

पृथ्वीवर आणण्यासाठी नासाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु

न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या अंतराळवीर (Astronaut) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ५ जून रोजी सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केलं होतं. त्यांच्यासह त्यांचे सहकारी बुच विल्मोर (Butch Wilmore) देखील होते. या गगनभरारीचं जगभरातून कौतुक करण्यात आलं. मात्र, यासंबंधीची ताजी अपडेट अख्ख्या जगाला हादरवून सोडणारी आहे. सुनीता विल्यम्स यांचे अंतराळयान स्टारलाइनरमध्ये (Starliner) तांत्रिक बिघाड झाला असून त्याचे पृथ्वीवर परतणे कठीण झाले आहे. याप्रकरणी नासाकडून (NASA) शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

अंतराळयानामधील तांत्रिक अडचणींमुळे बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत येण्यास विलंब होत आहे. लवकरच अंतराळयानातील तांत्रिक अडचणी सोडवून ते पृथ्वीवर परत येतील असे अभियंत्यांनी सांगितले आहे. हे दोघेजण स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने आयएसएसवर पोहोचले होते. स्टारलाइनर स्पेसक्राफ्टचे रिटर्न मॉड्यूल आयएसएसच्या हार्मनी मॉड्यूलवर डॉक केले आहे. हार्मोनी मॉड्यूलमध्ये फक्त मर्यादित इंधन शिल्लक आहे. स्टारलाइनमध्ये पाच ठिकाणांहून हेलियम गळतीमुळे परतीचा प्रवास सुरू होऊ शकलेला नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर वापरकर्ते म्हणत आहेत की स्टारलाइनरने केलेला अंतराळ प्रवास अत्यंत धोकादायक आहे. आता अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स पाठवले जाणे आवश्यक आहे. अंतराळवीर जोनाथन मॅकडॉवेल म्हणाले की, काही थ्रस्टर्स अयशस्वी झाले तरीही दोन अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षितपणे परत येऊ शकतात. या छोट्या समस्यांमुळे लँडिंगमध्ये काही फरक पडणार नाही.

दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर, बोईंग स्टारलाइनर ५ जून रोजी दोन्ही अंतराळवीरांसह रवाना झाले. २५ तासांच्या प्रवासादरम्यान अंतराळ यानात पाच ठिकाणांहून हेलियमची गळती होत असल्याचे आढळून आले. पाच थ्रस्टरने काम करणे थांबवले होते. बोईंग स्टारलाइनर प्रोग्रामच्या व्यवस्थापकाने स्वत: सांगितले की त्यांची हीलियम प्रणाली तयार केल्याप्रमाणे काम करत नाही. अभियंत्यांनाही ही समस्या काय आहे हे माहीत नाही.

२६ जूनचे होते परतीचे नियोजन

अंतराळयानाचे परतीचे नियोजन यापूर्वी २६ जून रोजी होणार होते. याआधी तीनदा रिटर्न पुढे ढकलण्यात आले आहे. नासाला हे मिशन अत्यंत काळजीपूर्वक, सावधगिरीने पूर्णत्वास न्यायचे आहे. यात त्यांना छोटीशीही चूक करायची नाही. ६ तासांच्या उड्डाणात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. नासा कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. विशेष म्हणजे या मिशनचे प्रक्षेपणही याआधी दोनदा पुढे ढकलण्यात आले आहे. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात ३२२ दिवस वास्तव्य केले आहे. अशा परिस्थितीत जगभरातील लोकांच्या हृदयाचे ठोके आता वाढू लागले आहेत.

अंतराळ मोहिमा अत्यंत धोकादायक

कोणत्याही अंतराळ मोहिमेतून परतणे अत्यंत जोखमीचे असते. स्टारलाइनरने जवळपास ६ तासांचा परतीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांना थ्रस्टर फेल्युअर, व्हॉल्व्हची समस्या आणि हेलियम गळतीची कारणे अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहेत. स्टारलाइनरच्या सध्याच्या फ्लाइटमध्ये, फक्त एक थ्रस्टर डेड अवस्थेत आहे. नासाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

इतिहास घडवणारे दोन अंतराळवीर

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या. यासह या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल अंतराळ केंद्रावरून निघाले. अशा मोहिमेवर उड्डाण करणा-या पहिल्या महिला म्हणूनही विल्यम्स यांनी इतिहास घडवला. मात्र, अद्याप इंजिनियरिंग टीम त्यांच्या परतीच्या प्रवासात येत असलेल्या समस्येचं मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. आता नासासह भारतीयांना देखील सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतीची आस लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -