Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीSharad Pawar Group : विधानसभा निवडणुकीत 'पिपाणी' चिन्ह यादीतून वगळा!

Sharad Pawar Group : विधानसभा निवडणुकीत ‘पिपाणी’ चिन्ह यादीतून वगळा!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर मूळ चिन्ह ‘घड्याळ’ हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला मिळालं तर शरद पवार (Sharad Pawar) यांना निवडणूक आयोगाने (Election Commission) ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिलं. या चिन्हबदलामुळे शरद पवार गटाची मतं घटतील, असा अंदाज होता. मात्र, शरद पवारांनी १० जागा लढवून त्यातील ८ जागा जिंकत मोठा विजय मिळवला.

त्याच दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) यादीत असलेल्या ‘पिपाणी’ या चिन्हामुळे शरद पवार गटाला साताऱ्याच्या जागेवर फटका बसला. तसेच जिंकलेल्या ठिकाणीही मताधिक्य काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत (VidhanSabha Election) हा धोका नको, म्हणून शरद पवार गटाने ‘पिपाणी’ चिन्ह यादीतून वगळावे, अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.

तुतारी आणि पिपाणी चिन्हे सारखी असल्यामुळे शरद पवार यांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. तसेच राष्ट्रवादीची सातारा लोकसभेची सीटही चिन्हाच्या घोळामुळे गमवावी लागली, असा दावा शरद पवार गटाने केला होता. यामुळेच त्यांनी पिपाणीविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं अशा मागणीचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

मागणी मान्य न झाल्यास सुप्रीम कोर्टात जाणार

सातारा लोकसभेत पिपाणीच्या चिन्हाचा घोळ झाल्यामुळे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत पाटील यांचा निसटता पराभव झाला. याठिकाणी पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला तब्बल ३७ हजार मते मिळाली. तसेच दिंडोरीमध्येही पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल १ लाख मते मिळाली होती. यामुळेच विधानसभेच्या बाबतीत शरद पवार गटाने सावध पावित्रा घेतला असून त्यांच्या मागणीबाबत निवडणूक आयोगाने योग्य निर्णय न घेतल्यास ते सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -