२७ जून पासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू

मुंबई: शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे प्रचलित नियमानुसार निधीसह पुढील टप्पा वाढ २५ जून २०२४पर्यंत न केल्यास २७ जून २०२४ पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे.


शासनाने मागील दोन अधिवेशनात फक्त टप्पा वाढीचे आश्वासन दिले, १ जानेवारी २०२४ पासून प्रचलित नियमानुसार निधीसह पुढील टप्पा वाढ देण्याबाबत शासनाने मागील अधिवेशनात मान्य केले होते,त्याबाबत सर्व शिक्षक संघटना राज्यातील विविध ठिकाणी अनेक मंत्री महोदयांना दररोज निवेदन देत आहोत,आता झालेल्या निवडणूकीपूर्वी मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, यांच्या बरोबर राज्यातील अनेक मंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला आहे की येणाऱ्या अधिवेशनात आम्ही निधीसह तरतूद करून घोषणा करू त्यामुळे आपण दिलेला शब्द पाळावा ,याबाबत ची घोषणा मा मंत्री महोदयांनी करावी, व येणाऱ्या अधिवेशनात निधीसह त्याला मंजुरी देण्यात यावी


शासनाने शिक्षकांचा अंत पाहू नये, आमच्या न्याय मागण्या मान्य न केल्यास त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपणास दिसून येईल असेही यावेळी त्यांनी सांगितले.



मागण्या


१) ६ फेब्रुवारी २०२३ नुसार ३० डिसेंबर २०२३ पर्यंत २०, ४०, ६० टक्के अनुदानास पात्र असलेल्या अनुदानावरील खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ग तुकडया यांना दिनांक ०१ जानेवारी २०२४ पासून वाढीव २०% वेतन अनुदान मंजूर करुन प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावे.


२) १५ नोव्हेंबर २०११ व ०४ जून २०१४ च्या शासन निर्णयाचे वेतन अनुदान सुत्र शाळांना लागु करून यापुढील प्रतिवर्षी ०१ जानेवारी पासूनच पुढील टप्पा देण्यात यावा.


३) शासन निर्णय दि. १२, १५ व २४ फेब्रुवारी २०२१ नुसार ३० दिवसात त्रुटीची पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ज्या वेतन अनुदानाच्या एका टप्याने मागे राहिल्या आहेत. अशा शाळांना मागील थकीत टप्पा अनुदान देवून ०१ जानेवारी २०२४ पासून समान वेतन अनुदानाच्या टप्प्यावर आणावे.
४) ६ फेब्रुवारी २०२३ नुसार शेवटच्या वर्गाची ३० पटसंख्या अभावी अपात्र ठरलेल्या शाळांना मागील तीन वर्षाच्या कोणत्याही एका वर्षांच्या संच मान्यतेच्या आधारावर पात्र ठरवून किंवा शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल (किमान २० विद्यार्थी)करून १ जाने. २०२३ पासून २०% अनुदान मंजूर करावे.
५) अंशतः अनुदानित मध्ये काम करणारे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवानिवृत्तीची वय ५८ वरून ६० करणेबाबत


तरी वरील मागण्या २५ जून २०२४ पर्यंत मान्य न झालेस आझाद मैदान मुंबई या ठिकाणी २७ जून 2024 पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.