Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीMatheran : माथेरानला पर्यटकांची तोबा गर्दी!

Matheran : माथेरानला पर्यटकांची तोबा गर्दी!

घाटातून पायपीट करण्याची नागरिकांची खंत

माथेरान : वर्षा सहलीसाठी सध्या अनेकजण माथेरानला (Matheran Tourism) अधिक पसंती देतात. चौथ्या शनिवारी सुट्ट्यांमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. मात्र घाटातून पायपीट करत जावे लागल्याची खंत यावेळी पयर्टकांनी व्यक्त केली.

सलग दोन दिवस घाटात नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या निष्क्रिय व्यवस्थेमुळे आणि कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडी (Traffic congestion) निर्माण झाली होती. त्यामुळे पर्यटकांना घाटातून आपल्या लवाजम्यासह पायपीट करण्याची एकप्रकारे माथेरानला आल्याची शिक्षा सहन करावी लागली होती. गावातील सर्व हॉटेल्स आणि लॉज फुल्ल झाले होते तर काहींना रूम्स अभावी माघारी जाण्याची वेळ आली. ई रिक्षाच्या स्वस्त आणि सुरक्षित वाहतुक सुविधेच्या प्रवासामुळे पर्यटकांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे.

प्रशासनाने वाहतूक कोंडी बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर भविष्यात माथेरानला पर्यटकांची संख्या निश्चितच रोडावेल आणि याचा सर्वाधिक फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील ,जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, नेतेमंडळीनी माथेरानमधील अल्प वोट बँकेचा विचार न करता या पर्यटन स्थळाला संजीवनी देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे वयोवृध्द मंडळी बोलत आहेत.

पर्यटकांचा नाराजीचा सूर

शनिवारी सुट्टी असल्यामुळे अनेकांनी याठिकाणी हजेरी लावली होती. पण याहीवेळी घाटात गर्दी पाहून पर्यटकांचे मन अस्वस्थ झाले. इथले प्रशासन या गावासाठी वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी काही प्रयत्न करणार आहेत की नाही. आम्हाला घाटातून पायपीट करण्याची शिक्षा दिली जात असल्याचे पर्यटकांकडून खंत व्यक्त केली जात आहे. तर माथेरान हे खूपच छोटेसे गाव आहे. त्यामुळे इथे काही हजार पर्यटक आले की फुल्ल होऊन जाते आणि नेरळ माथेरान एकच मार्ग असल्याने खूपच गर्दी वाहतूक कोंडी होते गव्हर्नमेंटने महाबळेश्वर प्रमाणे दुसरा पर्यायी रस्ता केल्यास बरे होईल. महाबळेश्वरला जाण्यासाठी खूप रस्ते आहेत मग इथे का केले जात नाहीत असे मुंबईहून आलेले पर्यटकइ रामकिशोर जांभवंत यांनी सांगितले.

माथेरानमध्ये दोन दिवस पर्यटकांची कोंडी

वर्षा सहलीसाठी शनिवारी व रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले. मात्र, धबधब्यांवर बंदी असल्याने मुंबई, पुण्यातील पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली. त्यामुळे गेली दोन दिवस माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आहे. मात्र हॉटेल, लॉजचे बुकिंग संपल्याने अनेकांनी राहण्याचे दरही वाढवले होते. त्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. तर एवढ्या पैशांत आम्ही अन्य दुसऱ्याठिकाणी जावून येवू अशाही टिपण्या पर्यटकांनी केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -