Tuesday, November 12, 2024
Homeताज्या घडामोडीCredit Card : क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे पडणार महागात!

Credit Card : क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे पडणार महागात!

१ जुलैपासून ‘हा’ नवा नियम लागू होणार

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सरकार मोठे बदल करत असते. त्यातच जून महिन्याचा अखेर जवळ आला असून आरबीआयकडून (RBI) मोठे बदल होणार आहेत. क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. आरबीआयच्या नियमानुसार, १ जुलैपासून क्रेडिट कार्डसंदर्भात नवा नियम जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना कार्डद्वारे बिल भरणे महाग पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या महितीनुसार, १ जुलैपासून, सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे केले जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्याच्या आणि भारताची पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ही सिस्टीम आणली आहे. त्यामुळे या नव्या नियमांचा परिणाम फोन पे, क्रेड, बिलडेस्क, इन्फिबिन यांसारख्या फिनटेक कंपन्यांवर पडण्याची शक्यता आहे.

तीन महिन्यांचा वेळ द्या

१ जुलैपासून लागू होणारा नवा नियम शिथिल करून बीबीपीएस प्रणाली चालू करण्यासाठी आणखी ९० दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी बँकांकडून करण्यात आली आहे. देशभरात एकूण ३४ बँकांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी आहे. परंतु आतापर्यंत यातील केवळ ८ बँकानी बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली आहे. त्यामुळे वेळ वाढवून देणे गरजेचे आहे, असे बँकांनी म्हटले आहे.

काय अडचण येईल?

एचडीएफसी (HDFC) बँकेने आतापर्यंत २ कोटी क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. आयसीआयसीआय (ICICI) बँकेने १.७ कोटी क्रेडिट कार्ड जारी केलेले आहेत. तर अ‍ॅक्सिस (Axis Bank) बँकेचे एकूण १.४ कोटी क्रेडिट कार्ड आहेत. मात्र या बँकांनी अद्याप बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. त्यामुळे फोन पे, क्रेड, तसेच अन्य अ पवरून या बँकांच्या क्रेडिट कार्डचे बील भरताना अडचण येऊ शकते. जोपर्यंत या बँका बीबीपीएस प्रणाली सक्रिय करणार नाहीत, तोपर्यंत वर नमूद केलेल्या अ‍ॅपच्या मदतीने क्रेडिट कार्डचे बील भरता येणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -