Friday, October 31, 2025
Happy Diwali

Onion Prices: ग्राहकवर्गाला कांदा आता नाही रडवणार! सरकारने खरेदी केला हजारो टन स्टॉक

Onion Prices: ग्राहकवर्गाला कांदा आता नाही रडवणार! सरकारने खरेदी केला हजारो टन स्टॉक

मुंबई: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या किंमतीवर आळा घालण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने बफर स्टॉकसाठी तब्बल ७१ हजार टन कांदा विकत घेतला आहे. कांद्यांच्या किंमतीने ४० रूपये प्रति किलोचा आकडा पार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांद्यांची घाऊक किंमत शुक्रवारी ३८.६७ रूपये किलो इतकी होती. सरकारला आशा आहे की येणाऱ्या काळात कांद्यांच्या वाढत्या किंमतीपासून दिलासा मिळेल.

यावर्षी ५ लाख टन खरेदीची तयारी

सरकारने किंमती स्थिर राखण्यासाठी या वर्षी ५ लाख टन कांदा खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारला आशा आहे की देशातील अधिकांश भागात मान्सून वाढण्यासोबतच रिटेल किंमतीही कमी होतील.

याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २० जूनपर्यंत केंद्र सरकारने बफर स्टॉक म्हणून ७०,९८७ टन कांदा खरेदी केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७४,०७१ टन कांदा खरेदी करण्यात आला होता.

भीषण उन्हाळा आणि पावसामुळे उत्पादन घटल्याची शंका

यावर्षी भीषण उन्हाळा आणि कमी पावसामुळे रबी पिकांच्या उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता आहे. कांद्यांच्या वाढत्या किंमतीला हेच कारण जबाबदार आहे. त्यामुळेच या वर्षीही कांद्याचा बफर स्टॉक वाढवण्यास वेग आला आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार या बफर स्टॉकचा वापर करेल. कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार गेल्या ऑगस्टपासून पावले उचलत आहे. याआधी ४० टक्के एक्सपोर्ट ड्युटी लावण्यात आली.

Comments
Add Comment