Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीBeed news : बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या कारसमोर मुंडे समर्थक आक्रमक!

Beed news : बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या कारसमोर मुंडे समर्थक आक्रमक!

घोषणाबाजी करत क्षीरसागर यांना गावातून बाहेर काढले

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट व शरद पवार गट समोरासमोर आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आज बीडमध्ये अशीच एक घटना घडली ज्यात अजित पवार गटाचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे समर्थक (Beed Munde Activist) आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांची कार येताच मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांना गावातून बाहेर काढले. हिंगणी (खुर्द) गावामध्ये ही घटना घडली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संदीप क्षीरसागर यांना मुंडे समर्थकांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. बीडच्या हिंगणी (खुर्द) गावात संदीप क्षीरसागर यांची कार येताच मुंडे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी गेली. ‘पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है!’, ‘महाराष्ट्राचा एकच ढाण्या वाघ धनंजय मुंडे साहेब’ अशा प्रकारच्या घोषणा मुंडे समर्थकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कारसमोर दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने मुंडे समर्थक एकत्र आले होते. यावेळी घोषणाबाजी करत मुंडे समर्थकांनी संदीप क्षीरसागर यांना गावाबाहेर काढले.

आमदार संदीप क्षीरसागर हे बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये काल रात्री साडेआठच्या दरम्यान गावाला भेट देत दौरा करण्यासाठी आले होते. यादरम्यान ते हिंगणी (खुर्द) येथे आले असता त्यांना मुंडे समर्थकांनी विरोध दर्शवला. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्या. या घोषणा देत त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना विरोध दर्शवत घोषणाबाजी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -