ब्लाइंड डे आऊट

Share

राणी सांगू लागली की, त्यांच्या कॉलेजमध्ये आज ‘ब्लाइंड डे आऊट’ होता. ‘ब्लाइंड डे आऊट’ याचा अर्थ वर्गातल्या सगळ्यांच्या डोळ्यांवर दोन पट्ट्या बांधण्यात येतात. मुलांना विविध ठिकाणी नेऊन मुलांनी अनुभवलेल्या घटनांचे वर्णन सांगितले जाते.

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

माझी मुलगी कॉलेजमधून घरी आली आणि ती सुन्न बसून होती-डायनिंग टेबलावर. काम करता करता, मी तिच्याकडे एक-दोनदा वळून पाहिले; पण ती विचारात पूर्ण गढलेली होती. जेवणासाठी ताट-वाटी-चमचा तिच्यासमोर ठेवला होता, त्यालाही दहा मिनिटे होऊन गेली होती.

‘राणी…’ अशी मी हाक मारताच ती दचकली आणि चमच्याने ताटात वाढून घ्यायला तिने सुरुवात केली. वाढता वाढता मला तिने विचारले,
“काय झालं गं?”
“तुला माहीत आहे का, पंधरा मिनिटे झाली, तू तशीच ताटासमोर बसलेली आहेस. काय झालं?’
परत जेवण विसरून, ती मला सांगू लागली की, त्यांच्या कॉलेजमध्ये आज ‘ब्लाइंड डे आऊट’ होता. ‘ब्लाइंड डे आऊट’ याचा अर्थ वर्गातल्या सगळ्यांच्या डोळ्यांवर दोन पट्ट्या बांधण्यात येतात. शंभर टक्के खात्री करण्यात येते की, त्यांना काहीही दिसत नाही. त्यानंतर त्यांना हाताला धरून, मार्गदर्शन करून वर्गाबाहेर नेऊन एका बसमध्ये चढवले जाते. सगळे विद्यार्थी आपापल्या पद्धतीने चाचपडून बसच्या सीटवर बसतात आणि त्यानंतर बस सुरू होते. त्यांना मुंबईतला काही भाग दाखवला जातो. ‘दाखवला जातो’ याचा अर्थ शिक्षक त्या भागातली माहिती देतात आणि ते जे काही चाललंय ते ऐकत अनुभवतात. अशा तर्ऱ्हेने तासाभरानंतर त्यांना परत हाताला धरून, बसच्या पायरीवरून खाली उतरवत, एका मागोमाग एकाला कॉलेजच्या वर्गात नेऊन बसवले जाते आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यांवरील पट्टी काढली जाते.

मुलगी तल्लीन होऊन सांगत होती आणि ती परत परत त्या अनुभवांना आठवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या चेहऱ्यावर त्रस्त भाव मला जाणवत होते. ती बोलायची थांबली. मीही काहीच बोलले नाही. मग ती म्हणाली,
“आई, किती भयानक आहे ना अंधत्व?”

“हो ना…”
“आम्ही ज्या अनुभवातून आज गेलो. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, आपल्याला खूप काही मिळालेलं आहे, तरीसुद्धा छोट्या छोट्या गोष्टींचं आपण दुःख करत राहतो. ज्यांना डोळेच नाहीत, त्यांनी हे जग कसे अनुभवायचं गं?”
‘डोळे’ ही मानवाला मिळालेली खूप मोठी देणगी आहे. आज आपल्याला डोळे नसतील, तर आपण रंग अनुभवू शकत नाही, हे एक वेळ चालू शकेल; परंतु रस्ता, खाचखळगे, समुद्र आणि किती तरी… सर्वात मुख्य म्हणजे समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव कधीच अनुभवता येणार नाहीत. आपण बोलताना समोरच्याच्या चेहऱ्यावरचे बदलते हावभाव बघून आपण एखादी गोष्ट पुढे नेतो किंवा कोणत्याही क्षणी थांबवू पण शकतो. डोळ्यांचे सौंदर्य व्यक्त करणाऱ्या किती तरी कविता डोळ्यांसमोरून सरकत गेल्या. अनेकांनी वळून वळून टाकलेले नेत्रकटाक्ष, प्रेमळ भाव, वासनामय दृष्टी, तिरस्काराने पाहणारी नजर सगळं काही आठवत राहिले. मुलीसारखी मीही सुन्न झाले.

आपल्याला मिळालेले शरीर, शरीरातील सर्व अवयव किती लाखमोलाचे आहेत, या विषयीच्या कथा आपल्याला शाळेपासून सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अपंग माणसांशी कसे वागावे, याविषयीची माहितीसुद्धा शाळेपासून, कथांमधून, नाटक-सिनेमातून वगैरे आपण घेतलेली असते, तरीही त्यांच्या दुःखाची तीव्रता आपल्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही. या पार्श्वभूमीवर मुलीच्या कॉलेजमध्ये त्यांना दिलेला अंधत्वाचा अनुभव आयुष्यभरासाठी त्यांच्या हृदयावर कायमचा कोरला गेला. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांसाठी ‘ब्लाइंड डे आऊट’ असे अनुभव विद्यार्थीदशेतच देणे महत्त्वाचे आहे. म्हणजे कधी एक, कधी दोन्ही हात बांधून ठेवून, एक पाय बांधून ठेवून, तर कधी कान बंद करून काही तास राहायला सांगणे इत्यादी. कोणत्याही अपंगाला कोणत्याही प्रकारची सहानुभूती आवडत नाही, तर त्यांची फक्त इच्छा असते की, त्यांना समजून घेणे. त्या कोणत्या प्रकारच्या कठीण समस्येतून जात आहेत, हे प्रत्येकाला खरेच कळण्याची गरज आहे.

काही तासांसाठी ‘ब्लाइंड डे आऊट’ अनुभवलेली माझी मुलगी अंतर्बाह्य पूर्ण बदलली, हे मला आवर्जून सांगायला आवडेल. जगाकडे बघायचा तिचा दृष्टिकोनच बदलून गेला. आपल्या मुलांवर आंधळं प्रेम करा; परंतु अंधाबाबत मात्र त्यांना दृष्टी मात्र द्या!

pratibha.saraph@gmail.com

Tags: blind

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

6 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

7 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

7 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

8 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

8 hours ago