Sunday, July 7, 2024
Homeक्राईमPune Koyata Gang : पुण्यात कोयता गँगची दहशत! पोलिसांच्या गाडीसह १५ ते...

Pune Koyata Gang : पुण्यात कोयता गँगची दहशत! पोलिसांच्या गाडीसह १५ ते २० वाहनांची तोडफोड

पुण्यात सलग दोनदा गुंडांचा धुमाकूळ

पुणे : पुण्यातील वाढती गुन्हेगारी (Pune crime) सध्या चिंतेचा विषय बनत चालली आहे. कधी हाणामारी, कधी गोळीबार तर कधी खून यांमुळे पुणे हादरलं आहे. त्यातच पुण्यात वारंवार कोयता गँगने (Pune Koyta gang) धुमाकूळ घातल्याच्या घटनाही समोर येतात. पुण्याच्या वडगावशेरी भागातून पुन्हा एकदा कोयता गँगने दहशत माजवल्याची घटना घडली आहे. काल सिंहगड रोडवर आता वडगावशेरीच्या गणेशनगर भागात कोयता टोळीने पोलिसांच्या गाडीसह १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. या टोळीला पोलिसांचा धाकच न उरल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये ही घटना घडली. यामध्ये पोलिसांच्या एका गाडीसह ६ कार, ४ रिक्षा, ३ दुचाकी आणि इतर वाहनांची कोयता गँगने तोडफोड केली. हातामध्ये कोयते आणि दगड घेत वाहनांची तोडफोड केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

पुण्यात सलग दोनदा वाहनांची तोडफोड झाली आहे. कालच सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी या ठिकाणी कोयता टोळीने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर मध्यरात्री चंदननगर परिसरातील वडगावशेरीत वाहनांची कोयता टोळीने तोडफोड केली आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर दहा ते पंधरा गुंडांचा तरुणावर हल्ला

पुण्यातील किरकटवाडी परिसरात काल संध्याकाळी ७:३० ते ९ च्या दरम्यान दहा ते पंधरा गुंडांनी हवेत कोयते फिरवून आणि दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या टोळक्याने नागरिकांना जखमी करण्याचा प्रयत्न केला असून या घटनेत दगड डोक्याला लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. हवेली पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेतलं असून यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्य आरोपी आणि इतर सात आरोपींवर कलम ३०७, ३५४, ३२३, ३२४, १४३ आणि इतर कलमांतर्गत हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -