भयानक दृश्य पाहून गावकऱ्यांची उडाली खळबळ
मुरैना : देशभरात आत्महत्या, मर्डर, अपघात अशा क्राईमच्या (Crime) घटना सातत्याने समोर येत असतात. अशातच मध्य प्रदेशातील एक धक्कादायक घटना (MP Crime) उघडकीस आली आहे. मध्यप्रदेश मुरैनायेथील चार पाच महिन्यांपूर्वी एका नदीत बुडालेली गाडी बाहेर काढण्यात आली. मात्र त्या गाडीचे दरवाजे उघडताच एक भयानक दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. (Car Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मुरैना इथे एका नदीत एक कार सापडली. त्या कारची अवस्था पाहून साधारण चार – पाच महिन्यापूर्वी ती नदीत पडली असेल असा अंदाज पोलिसांनी लावला. मात्र ही कार पाण्यातून काढताच त्यातून दोन मानवी सांगाडे सापडले आहेत. हे धक्कादायक दृश्य पाहून गावात एकच खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
मुरैना येथील गोपी गावात ग्रामस्थांना गुरुवारी कुवारी नदीत एक गाडी बुडल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना देताच रेस्क्यू टीम आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. रेस्क्यू टीम आणि जेसीबीच्या मदतीने ती कार नदीबाहेर काढण्यात आली. गाडी बाहेर काढताच त्यातून पुरुष आणि महिलेचे सांगाडे आढळून आले.
याबाबत पोलिसांनी गावकऱ्यांची विचारपूस केली असता हे सांगाडे एका कुटुंबातील दीर आणि वहिनीचा असल्याचे सांगितले. हे दोघे पोळ्याचा पुराचे रहिवासी होती. नीरज सखवार हा मिथिलेशचा दत्तक मेहुणा होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. तर हे दोघेही फेब्रुवारी महिन्यात घरातून अचानक बेपत्ता झाले होते. या दोघांची खूप शोधाशोध करण्यात आली, मात्र ते घरातून पळून गेले असा समज गावकऱ्यांचा झाला होता.
दरम्यान, नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. परंतु हा घात आहे की अपघात याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. त्याचबरोबर मृतांचे कुटुंब आणि गावकऱ्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.