Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीMNS : बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, जनमनातला आमदार संदिप वरळीत आणूया!

MNS : बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, जनमनातला आमदार संदिप वरळीत आणूया!

वरळीत विधानसभेसाठी मनसेकडून आदित्य ठाकरेंना डिवचणारं पोस्टर जारी

मुंबई : लोकसभेनंतर (Loksabha) आता सर्व राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी (VidhanSabha) कंबर कसली आहे. लोकसभेत महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray MNS) देखील विधानसभा निवडणुकीत मात्र स्वबळावर उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी मतदारसंघांची चाचपणी सुरु केली आहे. वरळीतून (Worli Vidhan Sabha) ते मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता वरळीत मनसे कार्यकर्त्यांनी संदीप देशपांडे यांना जिंकवून आणण्यासाठी प्रचारालाही सुरुवात केली असून वरळीतील ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना डिवचणारे पोस्टर्स त्यांनी लावले आहेत.

वरळीत ठाकरे गटाचा मोठा प्रभाव आहे. हा प्रभाव कमी करण्यासाठी मनसे आतापासूनच कामाला लागली आहे. वरळीत अनेक ठिकाणी संदीप देशपांडेंचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे यांना विधानसभेत पाडण्याचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. अनेकदा ठाकरेविरोधी नेते आदित्य ठाकरे यांचा ‘पेंग्विन’ असा उल्लेख करतात. याचाच अप्रत्यक्षपणे वापर करत आदित्य ठाकरेंना मनसेच्या पोस्टर्समधून टोला लगावण्यात आला आहे.

‘बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार, संदीप वरळीत आणूया. वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे सन्माननीय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार विधानसभेत पाठवूया यंदा वरळीकरांचं ठरलंय’, असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे आगामी काळात मनसे विरुद्ध ठाकरे ही चुरस कशी रंगत जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

२०१९ ला मनसेने उमेदवार दिला नव्हता

आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे वरळी विधानसभेतील विद्यमान आमदार आहेत. यंदा त्यांच्याविरोधात मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीत उतरले होते. ठाकरे गटातील पहिली व्यक्ती निवडणूक लढत असल्याने, राज ठाकरे यांनी त्यांच्याविरोधात कोणताही उमदेवार दिला नव्हता. मात्र, यंदा वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत पाहायला मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -