Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीAnil Ambani : गुंतवणूकदार झाले मालामाल! अनिल अंबानीच्या 'या' कंपनीची शेअरबाजारात तूफान...

Anil Ambani : गुंतवणूकदार झाले मालामाल! अनिल अंबानीच्या ‘या’ कंपनीची शेअरबाजारात तूफान तेजी

एक लाखाचे झाले तब्बल २३ लाख

मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) चढ-उतारादरम्यान मोठे उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या एका शेअरमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शेअर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. अशातच ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावर चांगली कामगिरी करत असल्याचे चित्र दिसूत येत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या चार वर्षांत २२०० टक्क्यांनी वाढ झाल्याने अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत.

एक लाखाचे झाले २३ लाख रुपये

अनिल अंबामी यांच्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ (Reliance Infrastructure) या कंपनीच्या शेअरचे मूल्य २७ मार्च २०२० रोजी ९.२० रुपये होते. २१ जून २०२४ रोजी हाच शेअर थेट २१४.८५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या चार वर्षांत या कंपनीने दमदार कामगिरी करत त्याच्या मूल्यात २००० टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. म्हणजेच गुंतवणूक दारांनी एक लाख रुपये गुंतवले असता आज त्याचे तब्बल २३.३५ लाख रुपये झाले असते अशी माहिती मिळत आहे.

एका वर्षात ४५ टक्क्यांनी वाढ

या कंपनीची एका वर्षातील कामगिरी पाहायची झाल्यास हा शेअर गेल्या एका वर्षात ४५ टक्क्यांनी वाढला आहे. या एका वर्षात या कंपनीचा शेअर १४७.७५ रुपयांवरून २१४.८५ रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरध्ये १३७ टक्क्यांची तेजी आली आहे. तर गेल्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर २८ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या ५२ आठवड्यांत या कंपनीच्या शेअरचे सर्वोच्च मूल्य ३०८ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांतील नीचांकी मूल्य १३४.८५ रुपये आहे.

विजय केडिया यांनी खरेदी केलेत ४०लाख शेअर्स

दिग्गज गुंतवणूकदार विजय किशनलाल केडिया यांनीदेखील अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत मोठी गुंतवणूक केलेली आहे. ट्रेंडलाइनच्या डेटानुसार विजय केडिया यांनी मार्च २०२४ च्या तिमाहीत रिलायन्स इन्फ्राचे ४० लाख शेअर्स खरेदी केलेले आहेत. कंपनीत त्यांची एकूण हिस्सेदारी १.०१ टक्का आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -