छत्रपती संभाजीनगर : जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा यासाठी सर्व महिलावर्ग वटपौर्णिमेला उपवास करुन वटवृक्षाची पूजा (Vat Purnima 2024) करतात. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आगळवेगळंच चित्र दिसून येत आहे. याठिकाणी पत्नीपीडित पुरुषांनी चक्क वडाची नव्हे तर पिंपळाची पूजा (Pimpal Purnima) केली आहे. ज्या पुरुषांच्या बायका सतत भांडतात, त्यांच्यावर खोटे खटले दाखल करतात, अशी पत्नी ‘सात जन्मच काय, सात सेकंदही नको’ अशी मनोकामना पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरालगत करोडी येथे असलेल्या पत्नी पिडीत पुरुष आश्रम येथे मागील सहा वर्षांपासून ’पिंपळ पौर्णिमा’’ साजरी करून पिंपळाला साकडे घालतात. ज्यांच्या पत्नीने पतीला त्रास देऊन त्यांचे जगणे मुश्कील केले, अश्या पत्नीपीडित पुरुषांच्या हक्कासाठी कुटुंबीय समस्या पुरुष संघटना स्थापन करण्यात आली आहे.
महिला अबला होत्या त्यावेळी महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले. परंतु सदर कायदे तयार होताना पुरुषांवर अन्याय होऊन पुरुष ‘’अबला’’ होतील, याचा विचारच न केल्याने आज खऱ्या अर्थाने पुरुष हतबल झाला आहे. त्यामुळे पुरुष सबलीकरण करण्यासाठी एकतर्फी कायदे रद्द होऊन पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे, असे संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी सांगितले.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो ( N.C.R.B.) च्या नुसार जवळपास ३२.२ टक्के विवाहित पुरुषांनी वैवाहिक जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्याच्या तुलनेत महिला आत्महत्या ह्या केवळ ४.८ टक्के इतक्या आहेत. एकतर्फी कायद्यामुळे आणि समाजाच्या एकतर्फी धारणेमुळे पुरुष खचून जाऊन त्याची काम करण्याची क्षमता कमी होते व परिणामी देशाचे दर डोई उत्पन्न देखील घटत चालले आहे, असे मत संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…