Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीPimpal Purnima : 'सात जन्मच काय, सात सेकंदही नको' अशी बायको!

Pimpal Purnima : ‘सात जन्मच काय, सात सेकंदही नको’ अशी बायको!

पत्नीपीडित पुरुषांनी साजरी केली ‘पिंपळपौर्णिमा’

छत्रपती संभाजीनगर : जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा यासाठी सर्व महिलावर्ग वटपौर्णिमेला उपवास करुन वटवृक्षाची पूजा (Vat Purnima 2024) करतात. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आगळवेगळंच चित्र दिसून येत आहे. याठिकाणी पत्नीपीडित पुरुषांनी चक्क वडाची नव्हे तर पिंपळाची पूजा (Pimpal Purnima) केली आहे. ज्या पुरुषांच्या बायका सतत भांडतात, त्यांच्यावर खोटे खटले दाखल करतात, अशी पत्नी ‘सात जन्मच काय, सात सेकंदही नको’ अशी मनोकामना पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून केली.

पीडित पुरुषांनी मारल्या पिंपळाच्या झाडाला फेऱ्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरालगत करोडी येथे असलेल्या पत्नी पिडीत पुरुष आश्रम येथे मागील सहा वर्षांपासून ’पिंपळ पौर्णिमा’’ साजरी करून पिंपळाला साकडे घालतात. ज्यांच्या पत्नीने पतीला त्रास देऊन त्यांचे जगणे मुश्कील केले, अश्या पत्नीपीडित पुरुषांच्या हक्कासाठी कुटुंबीय समस्या पुरुष संघटना स्थापन करण्यात आली आहे.

महिला अबला होत्या त्यावेळी महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले. परंतु सदर कायदे तयार होताना पुरुषांवर अन्याय होऊन पुरुष ‘’अबला’’ होतील, याचा विचारच न केल्याने आज खऱ्या अर्थाने पुरुष हतबल झाला आहे. त्यामुळे पुरुष सबलीकरण करण्यासाठी एकतर्फी कायदे रद्द होऊन पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे, असे संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी सांगितले.

पुरुषांसाठी संरक्षण कायदे करा

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो ( N.C.R.B.) च्या नुसार जवळपास ३२.२ टक्के विवाहित पुरुषांनी वैवाहिक जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्याच्या तुलनेत महिला आत्महत्या ह्या केवळ ४.८ टक्के इतक्या आहेत. एकतर्फी कायद्यामुळे आणि समाजाच्या एकतर्फी धारणेमुळे पुरुष खचून जाऊन त्याची काम करण्याची क्षमता कमी होते व परिणामी देशाचे दर डोई उत्पन्न देखील घटत चालले आहे, असे मत संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी व्यक्त केले.

पत्नी पीडितांच्या प्रमुख मागण्या

  •  पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग बनवावा.
  • एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी.
  • प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी.
  • जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन करावे.
  • कौटुंबिक वाद माननीय न्यायालयात गेल्यास एका वर्षाच्या आत निकाली काढावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -