Thursday, November 7, 2024
HomeदेशHeat Wave In India : देशभरात उष्णतेची लाट! ११० मृत्यू, ४० हजारांहून...

Heat Wave In India : देशभरात उष्णतेची लाट! ११० मृत्यू, ४० हजारांहून अधिक नागरिकांना स्ट्रोक

नवी दिल्ली : देशाच्या काही भागात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी आजही देशाच्या अनेक भागांत उष्णतेची लाट कायम आहे. देशभरात अनेकांनी या उष्णतेने (Heat Wave In India ) आपला जीव गमावला आहे. मृत्यू झालेल्या लोकांची संख्या धक्कादायक आहे. मागिल तीन महिन्यांत अतिउष्णतेमुळे आतापर्यंत ११० जणांचा मृत्यू झाला आहे. (Heatstroke) तसेच, यावर्षी एक मार्च ते १८ जून या कालावधीत ४० हजारहून अधिक लोकांना उष्माघाताचा त्रास झाला, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले आहे.

यामध्ये सर्वांत जास्त उष्णतेच्या लाटेचा फटका उत्तर प्रदेशला बसला आहे. राष्ट्रीय उष्मा-संबंधित आजार आणि मृत्यूचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राद्वारे (एनसीडीसी) संकलित केलेल्या माहितीनुसार ३८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर बिहार, राजस्थान आणि ओडिशातही उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या राज्यांकडून अंतिम माहिती आली नसल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलय. दरम्यान, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही एनसीडीसी विभागाकडून करण्यात आलं आहे.

एनसीडीसी’च्या माहितीनुसार १८ जून रोजी एका दिवसात उष्माघाताने सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर उत्तर आणि पूर्व भारत महिनाभरापासून उष्णतेच्या लाटेचा सामना करंत आहे. त्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत असल्याने अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देशही केंद्र सरकारने रुग्णालयांना दिले आहेत. तसंच, देशभरातील परिस्थिती आणि रुग्णालयांची सज्जता याचा आढावा घेत आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी उष्णतेमुळे आजारी पडणाऱ्यांवर उपचार करण्यासाठी विशेष उष्माघात विभाग सुरू करण्याचा आदेश दिले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने ‘उष्णता लाट हंगाम २०२४’बद्दल राज्य आरोग्य विभागासाठी आरोग्य विभागाने मार्गदर्शिका जारी केली आहेत. यानुसार उष्माघात आणि उन्हामुळे होणाऱ्या आजारांनी मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी एक मार्चपासून दररोज सादर करण्याची सूचना हवामान बदल आणि मानवी आरोग्य राष्ट्रीय कार्यक्रम (एनपीसीसीएचएच) मोहिमेतील अधिकाऱ्यांना केली आहे. उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखडा सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

  • भारतीय हवामान केंद्राने दिलेला पुढील चार दिवसांचा उष्णतेच्या लाटेचा अंदाज आरोग्य केंद्रे आणि जनतेपर्यंत पोहोचवावा
  • ओआरएसची पुरेशी पाकिटे, आवश्यक औषधे, आइस पॅक आणि उपकरणे यांची खरेदी आणि पुरवठा व्यवस्थित ठेवणे
  • सर्व आरोग्य केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करणे
  • उपचार कक्ष आणि रुग्णांसाठीच्या प्रतीक्षा कक्षात वातानुकूलनाची सोय करणे
  • उष्माघाताचा संशय असलेल्या रुग्णांवर प्राधान्याने आणि तातडीने उपचार करणे
  • वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी रुग्णालयांनी वीज वितरण महामंडळाच्या संपर्कात राहणे
  • हरित छत, थंडाव्यासाठी खिडक्यांना आडोसा करणे
  • जलपुनर्भरण, सौरीकरण आदी सोयी करणे
  • उष्णता जास्त असलेल्या प्रदेशात आरोग्य केंद्राबाहेर सावलीसाठी उपाय करणे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -