Saturday, March 15, 2025
Homeताज्या घडामोडीHeat Wave : मृत्यूचे तांडव! माणसांसह पक्षीही ठरले उष्माघाताचे बळी

Heat Wave : मृत्यूचे तांडव! माणसांसह पक्षीही ठरले उष्माघाताचे बळी

नवी दिल्ली : देशातील काही राज्यात पावसाचे (Monsoon) आगमन झाले आहे. मात्र अजूनही काही भागात नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा (Heat Wave) सामना करावा लागत आहे. जून महिन्याचा अखेर जवळ आला तरीही यंदा ऋतु चक्रात बदल झाल्याने पावसाची हवी तशी हजेरी लागल्याचे दिसून येत नाही. याचा फटका मानवी आयुष्यासह बऱ्याच पक्ष्यांना बसत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने निशाचर असलेले वटवाघूळ पक्षी जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. परंतु तीव्र उष्णतेमुळे कानपूर येथे मोठ्या प्रमाणात वटवाघूळ मृत अवस्थेत आढळून आले आहेत. तर दिल्लीतही २४ तासांत २२ जण उष्माघाताचे बळी ठरल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.

उष्णतेने वटवाघुळांचा झपाट्याने मृत्यू

उत्तर भारतात मैदानी पट्टा असल्याने मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट जाणवते. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा केले होते. मात्र या उष्णतेच्या लाटेचा सामना नागरिकांसह पक्ष्यांनासुद्धा करावा लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे कानापुरातील नाना राव पार्कमध्ये उष्णतेचा तडाका सहन न झाल्याने वटवाघुळांचा मृत्यू झाला आहे. साधारण १०० हून अधिक वटवाघुळांची मृत शरीरे नाना राव पार्कमध्ये आढळून आली. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वटवाघुळांच्या शरीराचे अवशेष पडल्याने रोगराई पसरेल अशी चिंता स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्लीत २४ तासांत २२ जणांचा मृत्यू

दिल्ली येथील राम मनोहर लोहिया (आरएमएल), लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) आणि सफदरजंग या तीन रुग्णालयांत गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे एकूण २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सफदरजंग रुग्णालयात उष्णतेमुळे त्रस्त ३३ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. ‘एलएनजेपी’ या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १७ पैकी पाच रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. तर, ‘आरएमएल’ रुग्णालयात गेल्या २४ तासांत उष्माघाताचे २२ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, सततच्या बदलत्या ऋतु चक्राचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि धोक्यात येणारे मानवी जीवन असे बरेच प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाले आहेत. तर प्रशासनाने याबाबत काही हालचाल करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -