मुंबई: निरोगी राहण्यासाठी आपल्याला हेल्दी डाएट आणि नियमित व्यायामाची गरज असते. काही लोक मॉर्निंग वॉक तर करतात पण तो किती वेळ करावा याबाबत संभ्रम असतो.
तज्ञांच्या माहितीनुसार दररोज कमीत कमी २० मिनिटे मॉर्निंग वॉक केला पाहिजे.
जे लोक सकाळच्या वेळेत २० मिनिटे मॉर्निंग वॉक करतात ते इतरांच्या तुलनेत ४३ टक्के कमी आजारी पडतात.
दररोज सकाळचा मॉर्निंग वॉक केल्याने तुमची रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते.
मॉर्निंग वॉक केल्याने हृदयाची गती वाढते आणि यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येऊ शकतो.
मॉर्निंग वॉक केल्याने पाय आणि पोटाच्या मांसपेशींना ताकद मिळते.
नियमितपणे मॉर्निंग वॉक केल्याने मेंदू शांत आणि बराच वेळ अॅक्टिव्ह राहतो.
नियमितपणे सकाळी उठून चालल्यास अल्झायमरचा धोकाही कमी होण्यास मदत होते.