
मुंबई: भीषण उन्हामुळे बाजारात सध्या लिची आणि कलिंगड मोठ्या प्रमाणावर आले आहेत. मात्र घरी आणण्याआधी तपासून घ्या की ते खाण्यालायक आहे की नाही ते. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात लिची आणि कलिंगड आहेत. ही नकली फळे जर तुम्ही जास्त काळ खात असाल तर तुमचे आरोग्य बिघडू शकते.
जाणून घेऊया की तुम्ही ही फळे खरेदी करण्याआधी २ रूपयांच्या गोष्टीने फळे चांगली आहेत की नाही हे तपासू शकता.
नकली लिची आणि कलिंगड
येथे नकली याचा अर्थ फळ प्लास्टिक अथवा रबराने बनलेले नाही. तर यांना लॅबमध्ये तयार केलेली असतात. कारण यांना चुकीच्या पद्धतीने पिकवली जातात. हे सुंदर आणि लाल दिसण्यासाठी हानिकारक रंगाचा वापर केला जातो.
भेसळयुक्त कलिंगड लाल दिसण्यासाठी त्यात सिरिंजच्या माध्यमातून रंग टाकले जातात. यासोबतच गोड बनवण्यासाठी शुगर सिरपचा वापर केला जातो. याच पद्धतीने हिरवी लिची लाल रंगाच्या स्प्रे कलरने पेंट केली जातात ज्यामुळे ती पिकलेली दिसतील. लिची गोड बनवण्यासाठी यात छोटे छोटे होल करून शुगर सिरप टाकले जातात. त्यानंतर काही वेळाने विकली जातात.
जर फळांना खोटे रंग लावले असतील तर तुम्ही २ रूपयांच्या गोष्टीने ते तपासू शकतात. यासाठी तुम्हाला २ अथवा ५ रूपयांचा कॉटन खरेदी केला पाहिजे. त्यावर लिची रगडा.जर त्यावर रंग लावला असेल तर कॉटन लाल रंगाचा होईल. याच पद्धतीने कलिंगड कापून घ्या आणि त्यावर कॉटन रगडा. जर कलिंगडामध्ये रंग मिसळला असेल तर कॉटन लाल होईल. जर रंग मिसळला नसेल तर कॉटन हल्का गुलाबी होईल.