Friday, July 11, 2025

Headphone: तुम्ही सतत हेडफोन लावून असता का? तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचे

Headphone: तुम्ही सतत हेडफोन लावून असता का? तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचे

मुंबई: काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली आहे की प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांनी आपली ऐकण्याची क्षमता गमावली आहे. त्यांना व्हायरल अटॅकमुळे सेन्सॉरी न्यूररल नर्व्ह हियरिंग लॉस झाल्याचे समजले आहे.


दरम्यान, सिंगर लोकांना हेडफोनमध्ये मोठ्या आवाजात जोरात गाणे ऐकण्याबाबत सावध करण्यात आले आहे.


हेडफोनमध्ये बराच वेळ मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने ऐकण्याची क्षमता कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.


अशातच जाणून घेऊया यासाठी किती आवाजामध्ये हेड फोनने ऐकले पाहिजे?


तज्ञांच्या माहितीनुसार हेडफोनमध्ये ८५db अथवा त्यापेक्षा अधिक आवाज असता कामा नये.


हेडफोनचा व्हॉल्यूम ६० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये.


तज्ञांच्या माहितीनुसार एका वेळेस १५-२० मिनिटांपेक्षा अधिक वेळ हेडफोनचा वापर करू नये.

Comments
Add Comment