Friday, October 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूज“गो पोटोबा गो” : रामदास आठवलेंचे योगासन पहायलाच हवे...

“गो पोटोबा गो” : रामदास आठवलेंचे योगासन पहायलाच हवे…

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते तालुका पातळीवरील सर्व नेते योगासन करून हा दिवस साजरा करत असतात. अनेक सेलिब्रटींसह आपापले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून आपण कसे योगासन करतो, हेही दाखविण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. केंद्र सरकारमधील सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आणि रिपाइंच्या आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही आज योगदिनानिमित्त योगासन केले. मात्र त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओवर नेटीझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रामदास आठवले हे त्यांच्या शीघ्रकवितांसाठी ओळखले जातात. यमक जुळवून तात्काळ एखादी कविता करून मनोरंजन करणे हा त्यांचा छंद आहे. कोरोना काळातही ‘गो कोरोना गो’ अशी आगळीवेगळी घोषणा देऊन आठवले यांनी कोरोना विरोधात लढण्यासाठी लोकांना प्रेरित केले होते. आता रामदास आठवले यांच्या योगासनावरही नेटिझन्स “गो योगा गो, योगा गो, गो योगा”, “गो पोटोबा गो” अशा मजेशीर कमेंट्स करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by PrahaarNews Live (@prahaarnewslive)

एका युजरने कमेंट करताना म्हटले आहे की, आठवले साहेब नेहमीच थट्टा करत असतात, त्यांनी खरंतर कॉमेडी मंत्री व्हायला हवं.

याशिवाय रामदास आठवले हे नेहमीच राहुल गांधी यांचे ट्रोलिंग करताना दिसतात. कधी ते त्यांच्या लग्नावरून ट्रोल करतात तर कधी काँग्रेस सत्तेत नसल्याबद्दल ट्रोल करतात. नुकताच राहुल गांधी यांचा वाढदिवस झाला. राहुल गांधी हे आयुष्यभर विरोधी पक्षनेता बनून राहावेत, अशा शुभेच्छा आठवलेंनी सोशल मीडियावरून दिल्या आहेत. यावरूनही आठवलेंना डिवचण्यात आले आहे. एका युजरने म्हटले की, सर तुम्ही व्यायाम, योग वैगरे सोडा. तुम्ही फक्त राहुल गांधींना ट्रोल करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -