मुंबईतील बांद्राच्या रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

  142

अलिबाग : मुंबईतील बांद्रा येथील रिझवी कॉलेजच्या एनसीसी विभागातील चौघा विद्यार्थ्यांचा खालापूर हद्दीतील मोरबा डॅममध्ये बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


रिझवी कॉलेजच्या एनसीसीमधील ३७ मुले/मुली खालापूर पोलिस ठाणे हद्दीत मोरबा डॅम साईबंधारा येथे कैंपसाठी आलेली आहेत. शुक्रवारी २१ जुन रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पैकी एक मुलगा पाण्यात बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी गेलेली अन्य तीन मुलेही डॅमच्या पाण्यात बुडाली होती. रेस्क्यू टीमच्या मदतीने चारही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून चौक येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत.


बुडालेल्यांमध्ये एकलव्य सिंग (वय १८ वर्षे), ईशांत यादव (वय - १९ वर्षे), आकाश धर्मदास माने (वय २६ वर्षे), रणथ महादू बंदा (वय १८ वर्षे) यांचा समावेश आहे. या घटनेबाबत मृतांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता