
वटपौर्णिमेमुळे वाचले कामगारांचे प्राण; नेमके काय घडले?
बार्शी : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi Fire) तालुक्यातील घारी शिवारात एका फटाके कारखान्यात स्फोट झाला. ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने आज वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे कारखान्याला सुट्टी होती व कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. घटनास्थळी पांगरी पोलीस दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, दीड वर्षापूर्वीच पागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरी शिवारात एका फटाके कारखान्यात स्फोट होऊन त्यात पाच महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच पुन्हा फटाके कारखान्यात स्फोट झाल्यामुळे सोलापूर जिल्हात खळबळ उडाली आहे.