Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीNagpur Accident : नागपुरात १७ वर्षीय मुलाला ट्रकने चिरडलं! मुलाचा जागीच मृत्यू

Nagpur Accident : नागपुरात १७ वर्षीय मुलाला ट्रकने चिरडलं! मुलाचा जागीच मृत्यू

‘हिट अँड रन’ने नागपूर पुन्हा हादरलं

नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा हिट अँड रनचा (Nagpur Hit nad Run case) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने अल्पवयीन मुलाला चिरडलं आहे. यात त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच शहरात एका भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेचच ही घटना घडल्याने नागपूर हादरलं आहे.

अश्विन आठवले (वय १७) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. काटोल रोडवरील गोरेवाडा झू परिसरात गुरुवारी (ता. २०) रात्री उशीरा ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विन दुचाकीवरुन जात असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अश्विन ट्रकखाली चिरडला गेला. अपघात पाहून लोकांनी गर्दी केली. मात्र, गर्दी पाहताच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठत अश्विनचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आठवडाभरातील हिट अँड रनची ही तिसरी घटना आहे.

दोन दिवसांपूर्वीच्या घटनेत मृतांचा आकडा वाढला

दोन दिवसांपूर्वी नागपुरातच फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना कारने चिरडलं होतं. आता याप्रकरणातील मृतांचा आकडा वाढला आहे. उपचारादरम्यान ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणातील मृतांचा आखडा ३ वर गेला आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -