Government Job : ८वी उत्तीर्ण असणाऱ्यांनाही मिळणार सरकारी नोकरीची संधी!

'या' कंपनीकडून मेगाभरती; 'असा' करा अर्ज


मुंबई : सध्या अनेक तरुण भरघोस पगारासह सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. मात्र इच्छुक असणाऱ्या प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणे शक्य नसते. त्यातच कमी शिक्षित असणाऱ्या युवकांना सरकारी नोकरी मिळणे कठीण असते. अशा युवकांसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (Mazagon Dock Shipbuilders Limited) विविध पदासांठी मेगाभरती सुरु केली आहे. यामध्ये ८वी ते १०वी पास असलेले उमेदवार देखील भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.



ऑनलाइन अर्ज करता येणार


माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने रिक्त जागांसाठी भरती जारी केली आहे. या अंतर्गत पात्र उमेदवारांची ५०० हून अधिक शिकाऊ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. भरतीसाठी केवळ ऑनलाइन अर्ज करता येईल. जे उमेदवार अर्ज करु इच्छितात ते mazagondock.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या या रिक्त पदांशी संबंधित महत्त्वाच्या तपशीलांची माहिती साईटवर मिळू शकते.



'या' तारखेआधीच करा अर्ज


या भरती मोहिमेद्वारे, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये एकूण ५१८ शिकाऊ पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अंतिम तारीख ही २ जुलै २०२४ असणार आहे.



पूर्व परीक्षेची तारीख


भरतीसाठी अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेची तारीख ही १० ऑगस्ट २०२४ निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र २६ जुलै रोजी जारी केले जाणार आहे. या लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी जावे लागणार आहे.



अर्ज करण्यासाठी लागणारी फी


या भरती मोहिमेद्वारे गट अ ची २१८ पदे, गट ब ची २४० पदे आणि गट क ची ६० पदे आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना १०० रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव श्रेणी, PH उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.



कोण अर्ज करू शकतो?


Mazagon Dock Shipbuilders Limited च्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून ८वी किंवा १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे उमेदवार किमान ५० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण झाले आहेत ते गट अ पदांसाठी अर्ज करू शकतात. १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी आयटीआय उत्तीर्ण झालेले गट बी पदासाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे, गट क पदांसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून ८ वी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.



मिळणारे वेतन


निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ५,५०० ते ८,५०० रुपये स्टायपेंड म्हणून दिले जातील. याविषयी इतर तपशील जाणून घेण्यासाठी, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.