Sunday, June 30, 2024
Homeताज्या घडामोडीShobha Bachhav : बच्छावांची शोभाताई झाली कसायांची आई!

Shobha Bachhav : बच्छावांची शोभाताई झाली कसायांची आई!

निवडून आणायला मदत केल्याबद्दल तीनशे पेक्षा जास्त गोमातांना कसायांकडे स्वाधीन करण्याचे खासदारांचे पोलिसांना धमकी वजा आदेश?

नाशिक : रमजानचा महिना संपल्यानंतर जवळपास ७० दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. या सणाला ईद-उल-जोहा असंही म्हटलं जातं. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचं महत्त्व आहे. मात्र दुसऱ्या बाजूला हिंदूंचे पवित्र दैवत असलेले गोमाता म्हणजे गाईला हिंदू धर्मात महत्त्व आहे आणि सर्व हिंदू गोमातेची मोठ्या प्रमाणात पूजा करतात. मात्र या गोष्टीचा कुठलाही विचार न करता मालेगाव सह देशभरात अनेक ठिकाणी ईदच्या दिवशी गाईंचा बळी दिला जातो.

त्याच प्रकारे मालेगाव मध्ये ईदच्या आधल्या दिवशी ३०० गाई विक्रीसाठी मालेगाव बाजार समितीमध्ये आले आहेत, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली आणि सदर माहिती ही गोरक्षकांनी पोलिसांपर्यंत देखील पोहोचवली. तरुण तडफदार असलेले नाशिक ग्रामीण एसपी आणि त्यांची टीम यांनी क्षणाचा विलंब न करता सर्व गाई ताब्यात घेतल्या आणि एका सुरक्षित ठिकाणी गायींची व्यवस्था करून त्यांना कत्तलीपासून वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले.

तसेच दुसरीकडे ज्यांना हिंदू लोकांनी निवडून दिले अशा लोकप्रतिनिधी शोभाताई बच्छाव यांना थेट आम्ही तुम्हाला निवडून दिले सर्व ठिकाणी तुम्हाला लीड नव्हते मात्र आमच्या मालेगावातील मुस्लिम समाजाने तुम्हाला लीड दिले निवडून आणले तुम्ही जमा केलेल्या गाई सोडून द्या असे जणू साकडेच काही विधर्मी लोकांनी खासदारांना घातले आणि नवनिर्वाचित खासदारांनी एसपी महोदयांना फोन करून गाईंची सुटका करा त्यांना गाय ताब्यात द्या अशा सूचना देखील दिल्याचे सदर व्हायरल संभाषणामध्ये दिसत आहे.

मात्र हिंदू समाजाने देखील त्यांना मतदान केले होते हे मतदान गाईंची कत्तल करण्यासाठी केले होते का अशा दबक्या आवाजात संपूर्ण मालेगाव मतदारसंघात चर्चा होते आहे. या संदर्भात नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अद्याप गाई घेण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. मात्र सदर क्लिप ही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाला वायरल झालेली आहे. हिंदूंच्या भावना देखील दुखावल्या गेल्या आहेत असे गोरक्षकांनी म्हटले आहे आणि या संदर्भात चक्क खासदारांनी आज प्रेस घेऊन विषय सारवा सारव करण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

तसेच नाशिक जिल्ह्यात अजून किती लोकप्रतिनिधींनी गायी कत्तल करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे त्यांना येत्या निवडणुकांमध्ये हिंदू समाज उत्तर देईलच आणि ते कोणते लोकप्रतिनिधी आहेत जे हिंदू धर्माविरुद्ध काम करता आहेत अशा दबक्या आवाजात चर्चा देखील सुरू झाले आहे आणि लवकरच काही गोरक्षक त्या सर्व लोकप्रतिनिधींचे नाव देखील समाजापुढे एक्सपोज करणार असल्याचे बोलले जात आहे. जर अजून अशा लोकप्रतिनिधिंचे संभाषण जर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाले तर सर्वच पक्षातील श्रेष्ठींना त्या लोकप्रतिनिधींना तिकीट द्यायचे की नाही याबाबत संभ्रम निर्माण होईल यात शंका नाही. त्यामुळे ते लोकप्रतिनिधी कोण हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -