Monday, July 1, 2024
Homeताज्या घडामोडीVidhanparishad Election : विधानपरिषद निवडणुका स्थगित करण्याची ठाकरे गटाची मागणी

Vidhanparishad Election : विधानपरिषद निवडणुका स्थगित करण्याची ठाकरे गटाची मागणी

काय आहे कारण?

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) येत्या १२ जुलैला राज्यात ११ जागांसाठी विधानपरिषद निवडणुका (Legislative Council Election 2024) पार पडणार आहेत. त्याकरता सर्व राजकीय पक्षांनी (Political Parties) जागांची चाचपणी देखील सुरु केली असून उमेदवारांची निवडप्रक्रियाही शेवटच्या टप्प्यात आली आहे. असं असताना ठाकरे गटाने (Thackeray Group) मात्र निवडणुका स्थगित करण्याची मागणी केली आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायलयाचा (Supreme Court) निकाल हाती आलेला नसताना अशा पद्धतीने निवडणुका घेणं हे घटनाबाह्य असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.

निवडणुका स्थगित करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणं आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणं, हे घटनाबाह्य असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. याशिवाय पक्ष फुटल्यानंतर काही आमदारांची सर्वोच्च न्यायालयात जी प्रतिज्ञापत्रं आहेत, त्यामध्ये ते शिवसेना ठाकरे गटात असल्याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत, त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कसा देणार? असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन ठाकरे गटाच्या वतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -