Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीTea Price Hike : 'गरम चाय की प्याली' महागली!

Tea Price Hike : ‘गरम चाय की प्याली’ महागली!

चहाप्रेमींना द्यावे लागणार जास्तीचे पैसे; नेमके कारण काय?

मुंबई : सकाळचा वाफाळलेला चहा, हातात पेपर असे निवांत क्षण सर्वांनाच हवे असतात. आपापल्या परीने प्रत्येक जण कडक चहासोबत सकाळची सुरुवात करत असतो. भारतातील लोकांना चहा प्यायला आवडतो. चहाचे उत्पादन (Tea production) आणि वापर या दोन्ही बाबतीत भारत (India) हा अग्रगण्य देश आहे. चहा उत्पादक देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक तर चीन पहिल्या क्रमांकावर येतो. जगभरातील देशांमध्ये प्रसिद्ध आणि स्वस्त पेय असण्याव्यतिरिक्त, चहा लोकांच्या जीवनात इतका एकरूप झाला आहे की त्याला वेगळे करणे अशक्य आहे. मात्र यंदा चहा महागल्याने (Tea Price Hike) प्रत्येक घोटासोबत लागणारे चटके अधिक तीव्र झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या मोठया प्रमाणात आहे. परंतु यंदा चहा पिणेही खिशाला जड जाणार असल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतीय चहा उद्योगाला प्रतिकूल हवामानामुळे चालू पीक वर्षाच्या जूनपर्यंत सहा कोटी किलोग्रॅम उत्पादनाची कमतरता भासत आहे. गेल्या वर्षीची तुलना करता यावेळी देशातील चहाचे उत्पादन कमी झाल्याचे माहिती मिळत आहे. त्यामुळे चहाचे कमी होणारे उत्पादन उत्पादकांच्या महसुलावर परिणाम करेल आणि चहाच्या किमती आणखी वाढतील, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सूर्यप्रकाशाचा अभावामुळे उत्पादनात घट

उत्तर भारतीय चहा उद्योगात गुंतलेली आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये धोकादायक परिस्थितीला तोंड देत आहेत. मे महिन्यातील अतिउष्णता आणि पावसाचा अभाव, अतिवृष्टी आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे चहाच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे.

चहाचे उत्पादन ६ कोटी किलोने कमी

टी असोसिएशन ऑफ इंडियाचे (ΤΑΙ) अध्यक्ष संदीप सिंघानिया यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, जूनपर्यंत चहा पिकाचे एकत्रित नुकसान गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा कोटी किलोग्रॅम असू शकते.

‘इतक्या’ टक्क्यांनी उत्पादन कमी झाल्याचा अंदाज

टी बोर्ड ऑफ इंडियाने काढलेल्या आकडेवारीवरून, एप्रिल २०२४ पर्यंत आसाममध्ये चहाचे उत्पादन सुमारे ८ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये १३ टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर आसाममधील चहांच्या बागांमध्ये मे महिन्यातील उत्पादन २० टक्के तर पश्चिम बंगालमधील ४० टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -