Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीRaosaheb Danve : 'जाऊ द्या घरी, वाजले की बारा' हे उद्धव ठाकरेंचे...

Raosaheb Danve : ‘जाऊ द्या घरी, वाजले की बारा’ हे उद्धव ठाकरेंचे धंदे!

तेच तेच मुद्दे असलेल्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाला लोकही कंटाळले

रावसाहेब दानवेंनी उपसलं टीकास्त्र

मुंबई : शिवसेना वर्धापन दिन काल ठाकरे गटाने (Thackeray Group) आयोजित केलेल्या समारंभात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या या टीकांमुळे भाजपा नेत्यांनीही आपले टीकास्त्र उपसले आहे. भाजपा नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंची भाषणं ही धोरणात्मक नसून करमणूक करणारी भाषणं झाली आहेत, अशी जळजळीत टीका केली. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही असा टोला भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, जाऊ द्या घरी, वाजले की बारा हे धंदे उद्धव ठाकरेंनी केले आहेत. ते राहून राहून डोक्यात येते. आता त्याला शब्दाची जोड देऊन करमणूक करण्याचं काम ते करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाषणात पुढची दिशा आणि विजय यावर भाष्य करायला हवं होतं. परंतु ते न करता नेहमीप्रमाणे शिवराळ भाषा वापरून मोदींवर टीका केली. ते एका नशेत आहेत. प्रत्येक भाषणात तोच तोच मुद्दा मांडतात. त्याला लोकही कंटाळलेत. जर त्यांना स्वत:ला वाटत असेल आम्ही सत्तेत येऊ तर आल्यानंतर काय करणार हे म्हणणं ठीक आहे. ब्रँड संपला ब्रँडी आली ही भाषा त्यांच्यासाठीच योग्य आहे. देशातील जनतेचा मोदींवर विश्वास आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झालेत असंही त्यांनी सांगितलं.

तसेच उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना केवळ दोनदा मंत्रालयात आले, ते शरद पवारांनी पुस्तकात मांडलं आहे. उद्धव ठाकरेंनी कधीही राज्याचं व्हिजन भाषणात मांडलं नाही आणि आताही मांडत नाहीत. मोदी देशाला २०४७ पर्यंतचं व्हिजन देतायेत. उद्धव ठाकरेंचं भाषण १० मिनिटांत संपतं, आता हिंदू बांधवांनो म्हणतही नाहीत. उद्धव ठाकरेंनी फार तीर मारला नाही. ९ जागा निवडून आणल्यात. शरद पवारांच्या ८ जागा निवडून आल्यात. नरेंद्र मोदींच्या २४० जागा निवडून आल्यात. २४० जागा निवडून आणणारा नेता एका बाजूला आणि ९ जागा निवडून आणणारा नेता चॅलेंज करतो अशी दानवेंनी उद्धव ठाकरेंची खिल्लीही उडवली.

महायुती राज्याची सत्ता पुन्हा मिळवेल

दरम्यान, उद्धव ठाकरेंची भाषणं टीका केल्याशिवाय होत नाहीत. माझ्यावर टीका करतात. शरद पवारांच्या घराबाहेर उभे असलेले उद्धव ठाकरे मी पाहिलेत. धोरणात्मक विषयावर बोलतच नाही. टीकेशिवाय काय केले असा सवालही रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंना केला. याउलट महायुतीत जागावाटपाचा वाद नाही. तिन्ही पक्षाचे नेते समजदार आहेत, या राज्याची सत्ता आम्ही पुन्हा मिळवू असंही दानवेंनी म्हटलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -