Monday, July 1, 2024
Homeक्राईमNashik Crime : नात्याला कलंक! सततच्या वादाला कंटाळून पत्नीनेच केला पतीचा खून

Nashik Crime : नात्याला कलंक! सततच्या वादाला कंटाळून पत्नीनेच केला पतीचा खून

संगनमत करून रचला खुनाचा कट

२४ तासाच्या आत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात गुन्ह्यांच्या (Nashik Crime) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचाही गुन्हेगारीत सहभाग वाढत आहे. अलीकडेच नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रिक्षा चालकाचा खून करण्यात आला. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. हे प्रकरण ज्वलंत असताना नाशिक नांदगाव येथे अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. पती-पत्नीच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना नांदगाव येथे घडली आहे. घरगुती वादाला कंटाळून महिलेने तिच्याच नवऱ्याचा खून (Murder Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मनपाचे कर्मचारी दीपक गोण्या सोनवणे (५४) यांची घरगुती वाद व अनैतिक संबंधातून पत्नी, प्रियकर, बहीण व मुलगा यांनी संगनमताने डोक्यात दगड घालून व लाकडी दांडक्याने मारुन घृणास्पद हत्या केली. ही घटना नाशिकच्या नांदगाव येथील जातेगाव (Jategaon) येथे घडली.

नेमके प्रकरण काय?

संशयित पत्नी पल्लवी दीपक सोनवणे, मेहुणी व मेहुणीचा मुलगा, नितीन चंद्रकांत मोरे यांनी संदीप लोखंडे, साईनाथ सोनवणे, लखन सोनवणे यांच्याशी संगनमत करून खुनाचा कट रचला. त्यानुसार दीपक यांना जातेगाव शिवारातील महादेव मंदिराजवळ बोलावून घेण्यात आले. या ठिकाणी लाकडी दांडक्याने व डोक्यात दगड मारून ठार केले. त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला ढकलून देत प्रेत झाडीत टाकून अपघात झाल्याचा बनावट प्रकार सर्वांसमोर उभारला.

२४ तासाच्या आत आरोपींना अटक

घटनास्थळी अपघाताचे चित्र दिसत असले तरी त्याबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आधारकार्डवरून मयताची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणानंतर संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून खुनाचा उलगडा झाला. सोनवणे व मोरे परिवारातील सहा जणांनी ही हत्या केल्याचे आणि पत्नीदेखील सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. तर २४ तासांच्या आत चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पोलिसांची याप्रकरणी अजूनही चौकशी व तपास सुरु आहे. मात्र नाशिकमधील गुन्हेगारीचे वाढते प्रकरण रोखणे पोलिसांसाठी आणखी आव्हानात्मक होत चालले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -