Wednesday, July 24, 2024
Homeक्रीडाIND vs AFG: बार्बाडोसमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड, आतापर्यंत किती जिंकलेत...

IND vs AFG: बार्बाडोसमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड, आतापर्यंत किती जिंकलेत सामने? घ्या जाणून सर्वकाही

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध गुरूवारी खेळत आहे. भारताने ग्रुप स्टेजमध्ये सलग ३ सामने जिंकले तर त्यांचा एक सामना रद्द झाला. अफगाणिस्तानचा संघही ३ सामने जिंकत सुपर ८मध्ये पोहोचला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत आणि रशीद खानच्या नेतृत्वात अफगाणिस्तानचा संघ बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनच्या केंसिंग्टन ओव्हलमध्ये भिडणार आहे. जाणून घेऊया बार्बाडोसमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड…

भारताने या मैदानावर आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. हे सामने भारताने २०१०मध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळले होते. पहिला सामना भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१०मध्ये ७ मेला खेळला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ४९ धावांनी हरवले होते. या सामन्यात रोहित शर्माने ४६ बॉलमध्ये ७९ धावांची खेळी केली होती. भारतीय संघ सामन्यात १३५ धावांवर ऑलआऊट झाला होता. तर दुसरा सामना भारताने याच मैदानावर २ दिवसांनी ९ मेला खेळला होता. येथे वेस्ट इंडिजने भारताला १४ धावांनी हरवले होते.

याचाच अर्थ भारताचा रेकॉर्ड या मैदानावर चांगला नाही. त्यांनी दोन्ही सामने हरले होते. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार की अफगाणिस्तानविरुद्ध भारत कशी कामगिरी करतो ते.प्लेईंग इलेव्हनबाबत बोलायचे झाल्यास भारत या सामन्यात अधिक स्पिनर्स खेळवू शकतो. अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाज, करीम जनत आणि अजमत उळ्लाह ओमरजमई जानेवारी २०२२मध्ये स्पिनर्सविरुद्ध अडखळताना दिसले आहेत. ते १३वेळा लेफ्ट आर्मचे शिकार ठरलेत

टीम इंडियाचे संभाव्य प्लेईंग ११- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -