Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीChandrashekhar Bawankule : ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी!

Chandrashekhar Bawankule : ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी!

चंद्रशेखर बावनकुळे यांचा गंभीर आरोप

मुंबई : सध्या राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन तापातापीचं वातावरण पाहायला मिळत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. ‘मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेणं चालणार नाही’, असं विधान त्यांनी केलं होतं. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार पलटवार केला आहे. नागपूरमध्ये (Nagpur) माध्यमांशी संवाद साधताना ‘ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत’, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘केंद्र सरकारचा ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे? याचा राज्याशी संबंध आहे. राज्याची भूमिका आहे. राज्याने निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही एवढे दिवस सत्तेत होता. शरद पवार यांची नेहमी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका राहिली आहे, हे लपून नाही आहे. त्यांच्या सरकारमधील जीआर पाहिले तर त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आले असते. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांसारख्या सवलती देता आल्या असत्या. पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार बोलत आहे हे आश्चर्य आहे.’

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोर्टामध्ये केस लढली नाही, योग्य वकील लावले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे आरक्षण गेले. जे आमच्या महायुतीच्या देवेंद्र फडणवीसांनी दिले. आता तुम्ही बोंबा मारत आहात त्या कुठल्या अधिकाराने मारत आहात? मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण देणारे आमचे महायुतीचे सरकार आहे.’

मविआ विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही

पुढे ते म्हणाले, ‘हे सकाळचे भोंगे आहेत आणि ३ पार्ट्या महाविकास आघाडी आहेत. हे फक्त लोकांना संभ्रमित करून विकासापासून दूर नेत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही. एवढे मोठे निर्णय केंद्र सरकारने केले आहेत त्यावर सरकारचे अभिनंद करणार नाही. सरकारला कुठल्याही गोष्टीचे क्रेडिट देणार नाहीत. मात्र लोकांना डायवर्ट करत आहेत. मीडियाच्या माध्यमातून विकासाची कामं डायवर्ट करत आहेत. महाराष्ट्राचे हित विकासावर आहे.’, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -