Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रठाणे‘काले मेघा, काले मेघा, पाणी तो बरसा’

‘काले मेघा, काले मेघा, पाणी तो बरसा’

८२ हजार १०३ ग्रामस्थांना आजही टँकरच्या पाण्याचा दिलासा

ठाणे : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस झाले. काळे ढग येतात, आकाश अंधारून येते, पाऊस मात्र पडत नाही, ढग मात्र निघून जातात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अजूनपर्यंत दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांना ‘काले मेघा, काले मेघा, पाणी तो बरसा’ असा टाहो फोडण्याची आता वेळ आलेली आहे. जून महिना अर्धा लोटला तरी जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील तब्बल २३३ गाव-पाड्यांमधील ८२ हजार १०३ गावकऱ्यांना आजही ४८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे मुबलक पाण्याअभावी गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत जीवघेणी पाणीटंचाई जूनचा अर्धा महिना संपला तरी कायम आहे. त्यामुळे आजपर्यंत २३३ गावपाड्यांना ४८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील ४३ मोठ्या लोकवस्तीच्या गावांसह १५५ आदिवासी पाड्यांना ४२ खासगी टँकर पाणीपुरवठा करीत आहेत.

शहापूरमधील ६३ हजार ६८३ ग्रामस्थांना या तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. मुरबाड तालुक्यातील १७ मोठी लोकवस्तीची गावे आणि १८ पाड्यांसाठी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मुरबाडमधील ही १८ हजार ४२० गावकऱ्यांना या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी या २६२ गावपाड्यांना ४८ टँकरने १ लाख १ हजार ७०७ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात आला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -