Vasai Murder: वसई हत्या प्रकरणात रवीना टंडनने दिली ही प्रतिक्रिया, म्हणाली...

मुंबई: मुंबईजवळील वसई भागात मंगळवारी एका तरुणाने आपल्या प्रेयसीची भररस्त्यात हत्या केली. आरोपीने लोखंडाच्या स्पॅनरने हत्या केली. आरोपीने लोखंडाच्या स्पॅनरने मुलीच्या डोक्यावर अनेक वार केले. यात त्या तरूणीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की आरोपीने किती निर्दयपणे तिचा खून केला. दरम्यान, रस्त्यावरून लोक जात होते मात्र कोणीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या व्हिडिओवर अभिनेत्री रवीना टंडनने एक्सवर शेअर करत आपला राग व्यक्त केला.


 


वसई प्रकरणात काय म्हणाली रवीना टंडन?


रवीना टंडनने एक्सवर ही पोस्ट शेअर रागात लिहिले की, तेथे उभे असलेले लोक तिला सहज वाचवू शकले असते. ही लाजिरवाणी बाब आहे. हे पाहून माझे रक्त खवळले. तिला पाहून कोणीच पुढे आले नाही. तिच्याकडे टोकदार अशी गोष्ट नव्हती. तिथे फक्त दोन लोकांनी हिम्मत दाखवायला हवी होती. या पद्धतीचे बदमाश खऱ्या जीवनात घाबरट असतात. त्यांना विरोध केल्यास ते पळून जातात. असे खोटे लोक खोट्याच्या मागे लपतात.



रोड रेजच्या आरोपामुळे रवीना चर्चेत


रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. रवीनाचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होता. यात गर्दीने तिला घेरले होते आणि अभिनेत्रीवर रोड रेजचा आरोप लावला होता.

Comments
Add Comment

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय

अशोक शिंदे बनले मनोवैज्ञानिक

अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनेता अशोक शिंदे यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता

तारा सुतारीया आणि वीर पहारिया यांच्या ब्रेकपची रंगली चर्चा, सोशल मीडियावर एकमेकांना केले...

मुंबई : अभिनेत्री तारा सुतारीया आणि वीर पहारिया हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. हे कपल एकमेकांना वर्षभरापासून डेट