Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाT-20 world cup 2024: विजयाच्या जवळ पोहोचूनही यूएसएचा पराभव, गौसची ८० धावांची...

T-20 world cup 2024: विजयाच्या जवळ पोहोचूनही यूएसएचा पराभव, गौसची ८० धावांची खेळी व्यर्थ

मुंबई: दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुपर ८मधील सामन्यात यूएसएच्या संघाला १८ धावांनी हरवले. अँड्रीज गौस आणि स्टीव्हन टेलर यांनी यूएसएला चांगली सुरूवात करून दिली. मात्र सातत्याने विकेट पडल्याने संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा खेळताना १९४ धावांचा विशाल डोंगर उभा केला होता. यात सगळ्यात मोठे योगदान क्विंटन डी कॉकचे होते. डी कॉकने ४० बॉलमध्ये ७४ धावांची खेळी केली तर एडन मार्करमने ४६ धावा आणि हेनरिक क्लासेनने ३६ धावा केल्या होत्या.

यूएसएचा संघ जेव्हा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला तेव्हा संघाची सुरूवात चांगली झाली. टेलर आणि गौसने तुफानी सुरूवात केली. तर गौस आणि हरमीत सिंहने ८१ धावांची भागीदारी केली. मात्र संघाला ती विजय मिळवून देण्यात पुरेशी ठरली नाही.

यूएसएसमोर १९५ धावांचे आव्हान होते. स्टीव्हन टेलर आणि अँड्रीज गौसने ३ षटकांत २८ धावा केल्या होत्या. मात्र चौथ्या षटकांत कॅगिसो रबाडाने टेलरला चकम ादेत २४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यानंतरही त्यांच्या धावांची गती कमी झाली नाही. पॉवरप्ले संपण्याआधीच संघाने ५० धावांचा आकडा पार केला होता.

एकवेळेस यूएसएची धावसंख्या १ बाद ५३ इतकी होती. मात्र पुढील २३ धावांत त्यांनी ४ विकेट गमावले. एक बाद ५३ अशा धावसंख्येवरून यूएसएचा संघ ५ बाद ७६वर पोहोचला. येथीन अँड्रीज गौस आणि हरमीत सिंह यांनी चांगली भागीदारी केली. त्यांनी एकत्र ७० धावा केल्या. १५व्या षटकांत गौसने ३३ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. १५ षटके संपेपर्यंत गौसने १२२ धावा केल्या होत्यया. १५ व्या आणि १६व्या षटकांत त्यांनी ३२ धावा केल्या. यामुळे यूएसएला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये २८धावांची गरज होती. मात्र १९व्या षटकांतील पहिल्या बॉलवर हरमीत सिंह बाद झाला. या षटकांत केवळ २ धावा आल्या. त्यानंतर २०व्या षटकांत यूएसएचा डाव १७६ वर संपुष्टात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -