Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजHajj Palgrims : हज यात्रेकरुंवर सूर्याचा कोप! ५५०हून अधिक भाविकांचा उष्माघाताने मृत्यू

Hajj Palgrims : हज यात्रेकरुंवर सूर्याचा कोप! ५५०हून अधिक भाविकांचा उष्माघाताने मृत्यू

२,००० यात्रेकरू रुग्णालयात दाखल

रियाध : सौदी अरेबियातील (Saudi Arabia) हज यात्रेसाठी (Hajj Palgrims 2024) मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांनी गर्दी केलीय. इस्लाम धर्मामध्ये हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हजला जायला हवे असे म्हटले जाते. त्यामुळे जगभरातील लाखो मुस्लीम हज यात्रेसाठी मक्केला जातात. मात्र यावेळी हज यात्रेकरुंना भीषण गर्मीचा त्रास सहन करावा लागला आहे. हज यात्रेवेळी अनेकांचा उष्मघाताने बळी घेतला आहे. यामुळे सौदी अरेबियाने हज यात्रेची केलेली तयारी वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली आहे. दरम्यान, हज यात्रेवरही (मक्का, सौदी अरब) उष्णतेच्या लाटेचा गंभीर परिणाम झाला आहे. तब्बल ५५० हज यात्रेकरुंचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. मृतांमधील ३२३ भाविक हे इजिप्तचे नागरिक आहेत. सौदी अरबमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, या भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे, तर एका व्यक्तीचा गर्दीमुळे मृत्यू झाला आहे.

तापमानात वाढ

सौदीमधील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवामान बदलामुळे तिथल्या वातावरणावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच हज यात्रेवरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. तिथले सरासरी तापमान ०.४ अंशांनी वाढ होत आहे. तर मक्का येथील ग्रँड मशिदीच्या परिसरात ५१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, असे सौदी राष्ट्रीय हवामान विज्ञान केंद्राने म्हटले.

दरम्यान, हज व्यवस्थापन समितीने भाविकांना छत्रीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त पाणी प्या, दुपारच्या वेळी बाहेर पडू नका, अशा सूचना देखील दिल्या आहेत. परंतु माऊंट अराफात येथे प्रार्थना आणि अनेक हज विधींसाठी यात्रेकरुंना दुपारच्या उन्हात थांबावे लागले होते. अनेक भाविक तासनतास तिथे उभे असल्यामुळे अनेकांची प्रकृती खालावली होती. यामुळे ५५० जणांचा मृत्यू झाला असून २००० जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -