Monday, March 24, 2025
Homeक्रीडाSmriti Mandhana: मंधानाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकले सलग दुसरे शतक

Smriti Mandhana: मंधानाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकले सलग दुसरे शतक

मुंबई: भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने तुफानी खेळ करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत दुसरे शतक ठोकले आहे. मंधानाने सलग दुसऱ्या सामन्यात शतक ठोकले. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे.

मंधानाने बुधवारी ऐतिहासिक खेळी केली. तिने शतक साकारताना अनेक रेकॉर्ड तोडले. मंधाना भारतासाठी सर्वाधिक वनडे शतक ठोकण्याच्या यादीत संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.

खरंतर भारतीय महिला संघातील सर्वाधिक वनडे शतक ठोकण्याचा रेकॉर्ड मिताली राजच्या नावावर होता. मितालीने २३२ सामन्यांत ७ शतक ठोकलेत. तर मंधानाने ८४ सामन्यांत ७ शतक ठोकलेत. मंधाना आता महिला टीम इंडियासाठी सर्वाधिक शतक ठोकण्याच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थानावर गेली आहे.

मंधानाच्या नावावर रेकॉर्ड

स्मृती मंधाना टीम इंडियासाठी महिला क्रिकेटमध्ये सलग दोन वनडे शतक ठोकणारी पहिली महिला ठरली आहे. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्द मालिकेतील पहिल्या सामन्यात ११७ धावा ठोकल्या होत्या. स्मृतीने या खेळीत १२ चौकार आणि १ षटकार ठोकला होता. भारताने हा सामना १४३ धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या वनडेतही तिने शतक ठोकले.

स्मृतीने १२० चेंडूंचा सामना करताना १३६ धावांची खेळी केली. तिने या दरम्यान १८ चौकार आणि २ षटकार ठोकले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -