Friday, October 4, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सेवांची प्रमाणबद्धता

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सेवांची प्रमाणबद्धता

डॉ. जे. एन. श्रीवास्तव, डॉ. के. मदन गोपाल, डॉ. स्वर्णिका पाल, डॉ. अर्पिता, डॉ. अभय दहिया

राष्ट्रीय आरोग्य अभियान (The National Health Mission – NHM) हा आरोग्यविषयक सर्वंकष सेवा-सुविधा सर्वत्र आणि सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवला जात असलेला एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रामुख्याने आदिवासी तसेच आजवर अशा सोयी-सुविधांपासून वंचित राहिलेल्या भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या अंतर्गत आरोग्यविषयक पायाभूत सेवा-सुविधा बळकट करणे, मनुष्यबळाची उपलब्धता वाढवणे आणि आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधांच्या पुरवठ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर दिला गेला आहे. या उपक्रमाअंतर्गतच्या अशा एकजिनसी प्रयत्नांमधून सार्वजनिक आरोग्यविषयक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच आरोग्यविषयक पायाभूत सेवा-सुविधा देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या देशाच्या समर्पणाचेच प्रतिबिंब उमटले असल्याचे निश्चितच म्हणता येईल.

विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून भारताने आरोग्यविषयक क्षेत्रात केलेल्या उपाययोजनांद्वारे लोकसंख्यावाढीचे स्थिरीकरण, माता, अर्भक आणि बाल आरोग्य तसेच संसर्गजन्य रोगांशी संबंधित प्रमुख निर्देशांकांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणली आहे. अशा निर्देशांकांच्या घसरणीचा विशेषत: माता, अर्भक आणि पाच वर्षांखालील मृत्यूदरासारख्या निर्देशकांमधील घट यांचा आपल्या देशातील सरासरी दर हा जागतिक सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. मात्र असे असले तरीदेखील देशाच्या आरोग्य व्यवस्थेसमोर वाढती लोकसंख्या, उद्भवणारे नवे आजार, सातत्याने बदलणारी स्थिती, आरोग्यविषयक स्थितीनुसार योग्य उपचरांसाठीच्या सोयीची उपलब्धता आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा अशा प्रकारची आव्हाने कायमच समोर येत राहिली आहेत.

आरोग्य सेवा-सुविधा व्यवस्थेचे बळकटीकरण आणि आरोग्यविषयक सेवांच्या गुणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न :
देशातील आरोग्यविषयक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अनेक नियोजनबद्ध कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र असे असले तरी सार्वजनिक आरोग्यविषयक सेवा-सुविधांचा क्षमतेपेक्षा कमी वापर, अयोग्य किंवा असुरक्षित उपचार, चुकीचे निदान आणि रुग्णांचा आदर न करणारी आरोग्यविषयक सेवा ही आणि अशी अनेक आव्हाने बऱ्याच अंशी आजही कायम आहेत.

खराब आरोग्यविषयक पायाभूत सुविधा, आरोग्य क्षेत्राशी संबंधित मनुष्यबळाची कमतरता (human resources of health – HRH) आणि रुग्णांची निगा घेण्याची निकृष्ट सेवा यांसारख्या बाबी, देशातील आरोग्यविषयक व्यवस्था ढासळण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमागची मुख्य कारणे असतात. अनपेक्षित तरीही वेळेवर योग्य उपचार देता आले तर टाळता येण्याजोगे मृत्यू, खराब आरोग्यविषयक स्थिती, औषधोपचारांसाठी नागरिकांवर पडणारा आर्थिक भार आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा नागरिकांचा विश्वास गमावला जाण्यासारख्या घटनांशी याचा थेट संबंध आहेच.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -